INDIA: 'इंडिया आणि भारत'मधील फरक सांगणारा लालूंचा जूना VIDEO; सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Old Video Of Lalu Prasad Yadav Explaining Difference Between India Bharat
Old Video Of Lalu Prasad Yadav Explaining Difference Between India Bharat
Updated on

नवी दिल्ली- केंद्र सरकार इंडिया नावाचा त्याग करणार असल्याचं स्पष्ट आहे. यावरुन देशात गोंधळ सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा एक जूना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडिया आघाडीने केंद्र सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे. लालू प्रसाद यादव हेही इंडिया आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची चर्चा सुरु झाली आहे. (Old Video Of Lalu Prasad Yadav Explaining Difference Between India Bharat)

एनडीटीव्हीने लालू प्रसाद यादव यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये लालू यांनी इंडिया आणि भारत या मधला फरक सांगितला होता. मुलाखत घेत असताना लालू यादव कडूलिंबाच्या काडीने दात घासत होते. यावेळी पत्रकाराने विचारले की, तुम्ही दिल्लीमध्ये असतानाही कडूलिंबाच्या काडीने दात घासता का? यावर लालू यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये त्यांना कडूलिंबाच्या काडी मिळत नाही.

Old Video Of Lalu Prasad Yadav Explaining Difference Between India Bharat
INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या बैठका आता थांबणार! संजय राऊतांनी दिली मोठी अपडेट

मी नेहमीच कडूलिंबाच्या काडीने दात घासतो. पण, दिल्लीमध्ये असताना कडूलिंबाच्या काडी मिळत नाही. त्यामुळे असंच दात घासावे लागतात. दिल्ली 'इंडिया' आहे आणि पाटणा 'भारत' आहे. असा फरक लालू प्रसाद यादव यांनी पत्रकाराला सांगितला होता. केंद्र सरकार संविधानामध्ये इंडिया नाव बदलून भारत करणार असल्याची शक्यता आहे. संसदेच्या अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जी-२० शिखर परिषदेसाठी जगभरातील नेत्यांची बैठक नवी दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीसाठी स्नेहभोजनासाठी देण्यात आलेल्या आमंत्रणाच्या अधिकृत कागदपत्रांवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी सात सप्टेंबरला इंडोनेशिया दौऱ्यावर जात आहेत. यासाठी जारी करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांवरही प्राईम मिनिस्ट ऑफ इंडिया असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकार यादृष्टीने पुढे जात असल्याचं दिसतंय.

Old Video Of Lalu Prasad Yadav Explaining Difference Between India Bharat
Bharat Vs India : जिना यांनीही घेतला होता 'इंडिया' नावावर आक्षेप; शशी थरूर यांचं विधान

भाजपला विरोध करण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी उभी केली आहे. इंडिया आघाडीला घाबरुन केंद्र सरकारने नाव बदलण्याचा घाट घातला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. मोदी सरकार १८-२२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात इंडिया नावाला हटवण्यासाठी विधेयक सादर केले जाण्याची भीती विरोधकांना आहे. त्यामुळे जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.