मोहाली : पंजाबच्या मोहाली येथील इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीवर रॉकेट सदृश्य हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. यामुळंच एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा जमा झाला आहे. या हल्ल्यामध्ये इमारतीचं मोठं नुकसान झालं असलं तरी जीवितहानीचं अद्याप वृत्त नाही. (Rocket attack on intelligence building in Mohali Punjab Sensation from the explosion)
आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, मोहालीतील सोहाना इथं इंटेलिजन्स ब्युरोच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाला. आज (सोमवार) रात्री साडेसात वाजता हा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तीशाली होती की संपूर्ण इमारतीच्या काचा फुटल्या. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा जमा झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, रॉकेटच्या माध्यमातून डागण्यात येणाऱ्या ग्रेनडचा हा हल्ला असून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तो फेकण्यात आला होता. प्राथमिक तपासात हे आढळून आलं आहे की, हा हल्ला RPG द्वारे करण्यात आला आहे. RPG म्हणजे रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड.
या हल्ल्याआधी दोघे जण कारमधून आले, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस सध्या या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ह्या प्रकरणाची चौकशी होत असल्याची माहिती दिली आहे. पंजाबमधलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही, असं मान आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.