Delhi High Court Receives Petition: लोकसभेआधी भारतातील रोहिंग्या निर्वासितांना कशाची वाटतीये भीती? हायकोर्टात घेतली धाव

Rohingya Refugees File PIL Against Facebook: दोन रोहिंग्या निर्वासितांनी दिल्ली हायकोर्टामध्ये जनहीत याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून याकाळात फेसबुकवर रोहिंग्या निर्वासितांविरोधात कॅम्पेन सुरु करण्यात येण्याचा धोका याचिकेत व्यक करण्यात आला आहे.
Rohingya refugees petition
Rohingya refugees petition Sakal
Updated on

नवी दिल्ली- दोन रोहिंग्या निर्वासितांनी दिल्ली हायकोर्टामध्ये जनहीत याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून याकाळात फेसबुकवर रोहिंग्या निर्वासितांविरोधात कॅम्पेन सुरु करण्यात येण्याचा धोका याचिकेत व्यक करण्यात आला आहे. रोहिंग्या निर्वासितांचा दहशतवादी आणि घुसखोर अशा प्रकारचा उल्लेख सोशल मीडियावर करण्यात येत असल्याचं याचिकेमध्ये म्हणण्यात आलं आहे.

मोहम्मद हमीम आणि कावासर मोहम्मद या दोघांनी याचिका दाखल केली आहे. हे दोघे २ ते ५ वर्षांपासून दिल्लीमध्ये राहत आहेत.आपल्या समाजातील लोकांच्या जीविताच्या हक्काचे संरक्षण व्हावे. दिल्ली आणि देशातील इतर भागात त्यांच्या जीविताला धोका आहे. त्यासाठी उपाययोजना कराव्यात असं याचिकेमध्ये म्हणण्यात आलं आहे. म्यानमारमध्ये सुरु झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर अनेक रोहिंग्यांनी भारतात आश्रय घेतला होता.(Rohingya refugees petition was filed in high court over hate campaigns on Facebook flag high risk in lok sabha poll year)

Rohingya refugees petition
Rohingya Crisis : मलेशियात रोहिंग्या तरुणी भोगतायेत नरकयातना

रोहिंग्या हा म्यानमारच्या राखाईन प्रांतातील मुस्लीम अल्पसंख्याक समूदाय आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये म्यानमार लष्कराने रोहिंग्यांविरोधात अत्याचाराची मोहिमच सुरु केली होती. त्यामध्ये आतापर्यंत ७,७०,००० रोहिंग्यांनी मान्यमार सोडला असून ते जवळच्या देशात गेले आहेत. माहितीनुसार, जवळपास २० हजार रोहिंग्या भारतात राहत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शिबिरांमध्येही अनेक रोहिंग्या मुस्लिम राहत आहेत.

याचिकेमध्ये म्हणण्यात आलंय की, रोहिंग्यांविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केली जात आहेत. खासकरुन फेसबुकवर आम्हा लोकांना लक्ष्य करण्यात येत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणीवेळी रोहिंग्याच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या विषयी अनेक खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. आता २०२४ च्या लोकसभा निवडकीआधी देखील अशीच स्थिती निर्माण होईल अशी भीती आहे.

Rohingya refugees petition
रोहिंग्या मुस्लिमांची शोकांतिका! म्यानमार करतंय त्यांच्या वास्तव्याचे पुरावे नष्ट

फेसबुक अशा पोस्टवर कारवाई करण्यास कमी पडत आहे. अशा द्वेषपूर्ण वक्तव्यांना फेसबुकवर व्यासपीठ मिळत आहेत. फेसबुकवरच्या अफवांमुळे भारत आणि इतर देशांमध्ये रोहिंग्यांवर हल्ले होते आहेत. यावर काही निर्बंध घालणे आवश्यक आहेत, असं याचिकेमध्ये म्हणण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()