Ram temple: 'मंदिराचे छत गळत नाहीये, त्यामागे दुसरं कारण'; निर्माण कार्याची जबाबदारी असणाऱ्या नृपेंद्र मिश्रांनी केला खुलासा

Nripendra Mishra Head Of construction work: पहिल्या मजल्याचे निर्माण कार्य पुढील महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या मजल्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यानंतर यावर्षीच्या शेवटापर्यंत तेही काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले.
Nripendra Mishra
Nripendra Mishra
Updated on

नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिराच्या छतातून पाणी गळत असल्याच्या दाव्याला निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी नाकारलं आहे. त्यांनी राम मंदिरात पाणी गळण्यासाठी दुसरे कारण असल्याचं म्हटलं आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पाणी पडत आहे, कारण मंदिराचा दुसरा मजला पूर्णपणे उघडा आहे, असं नृपेंद्र मिश्र म्हणाले आहेत.

नृपेंद्र मिश्र एएनआयशी बोलत होते. मी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाचं पाणी पडताना पाहिलं आहे. आम्हाला याची अपेक्षा होती, कारण दुसरा मजला पूर्णपणे उडला आहे. पहिल्या मजल्याचे निर्माण कार्य पुढील महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या मजल्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यानंतर यावर्षीच्या शेवटापर्यंत तेही काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले.

Nripendra Mishra
Ram Mandir Ayodhya: पहिल्या पावसात राम मंदिराच्या छताला गळती, मुख्य पुजाऱ्यांनी केली चौकशीची मागणी

मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे, त्यामुळे मंदिराच्या गर्भगृहात नाली बंद करण्यात आली आहे. मंदिरातले पाणी हाताने काढले जात आहे. पाणी अशा प्रकारे गळणे किंवा खाली साचणे याचा मंदिराच्या डिझाईनशी काहीही संबंध नाही. फ्लोअर उघडा असल्याने पाणी खाली पडतच असते, असं नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्ट केलं. अयोध्यामध्ये शनिवारी-रविवारी जवळपास ६७ एमएम पाऊस पडला होता. यामुळे पूर्ण शहरात पाणी साचले होते. रस्त्यावर देखील ठिकठिकाणी पाणी साचले होते.

Nripendra Mishra
IIT Bombay fines students: IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचा पराक्रम! नाटकात प्रभू राम अन् सीतेची केली चेष्टा, संस्थेने दिली कठोर शिक्षा

मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास काय म्हणाले होते?

अयोध्येत रामजन्मभूमीवर मंदिर उभारल्याच्या घटनेला अजून सहा महिनेही पूर्ण झाले नसताना पहिल्याच पावसात मंदिराच्या छतातून पाणी गळत असल्याचे दिसून आले होते. रामलल्लाची मूर्ती असलेल्या गर्भगृहातही पाणी साचल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीच दिली होती. अयोध्येत शनिवारी मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळला. या वळी मंदिराचे छत गळत असल्याचे लक्षात आले होते.

गर्भगृहाच्या समोरच्या मंडपात पाणी साचले होते. वीज प्रवाहित होऊन झटका तर बसणार नाही ना, अशी भीती दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वाटत होती. म्हणूनच रविवारी काकड आरतीही बॅटरीच्या प्रकाशात करावी लागली होती. एक-दोन दिवसांत काही उपाय केला नाही तर दर्शन आणि पूजाही बंद करावी लागेल, असे सत्येंद्र दास यांनी सांगितले. मंदिर बांधताना काही त्रुटी निश्चितच राहिली असून ती दूर करणे आवश्यक आहे, असेही सत्येंद्र दास यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com