पश्चिम बंगालमधील वीरभूम येथील हिंसाचारावरून राज्यसभेत आज भाजप व तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांमध्ये जोरदार गदारोळ झाला. वीरभूम येथील घटना गंभीर असल्याचे सांगताना भाजप खासदार व अभिनेत्री रुपा गांगुली यांना सभागृहातच रडू कोसळले. मात्र त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करताच तृणमूलच्या खासदारांनी संतापून सभागृह डोक्यावर घेतले. रामपूरहाट येथे ८ लोकांना जिवंत जाळून ठार केल्याच्या घटनेचे राजकारण दिल्लीत संसदेपर्यंत पोचले असूनबंगालमधील ममता बॅनर्जी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याची दखल घेतल्याने बंगालच्या खासदारांमध्ये धास्तीचे वातावरण दिसत आहे.
खासदार रुपा गांगुली यांनी शून्य प्रहरात, बंगालमध्ये लोक बोलू शकत नाहीत. संपूर्ण राज्य दहशतीच्या सावटाखाली आहे. बंगाल आता राहण्यास योग्य असा प्रदेश राहिलेला नाही, असे वाक्य उच्चारताच तृणमूलच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ सुरू केला. सामूहिक हत्या करणाऱ्यांना सरकारचे संरक्षण मिळते. जेथे सरकार निवडणूक जिंकल्यावरही लोकांच्या हत्या करते, असे दुसरे राज्य देशात नाही, असे गांगुली यांनी सांगितल्यावर तर तृणमूल खासदारांनी त्यांच्याकडे धाव घेण्याचेच बाकी ठेवले. एवढे वातावरण तप्त झाले होते. तृणमूलच्या डोला सेन व इतर खासदारांनी वेलमध्ये धाव घेऊन गोंधळ सुरू केल्यावर उपसभापती हरिवंश यांनी कामकाज १२.१० वाजेपर्यत तहकूब केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.