आजपासून प्रेमाच्या आठवड्याला सुरूवात होत आहे. आज पहिला दिवस असून रोज डे आहे. प्रेमाचे प्रतिक असलेले गुलाबाचे फुल एकमेकांना देऊन हा दिवस साजरा केला जातो. गुलाबाच्या फुलाचा विषय आला की एक चेहरा आपल्याला नक्की आठवतो. तो म्हणजे कोटाच्या खिशाला गुलाबाचे फुल असलेले पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू.
एकिकडे देश स्वातंत्र्य होत होता. देशाची नवी घडी बसवली जात होती. आणि त्याच काळात एक प्रेम कथा गुलाबाची कळी उमलावी तशी फुलत होती. या प्रेमकथेत कुठेही बडेजाव नव्हता. तर, कुठेही शारिरीक आकर्षण नव्हते. होते ते केवळ प्रेम. ते जोडपे होते चाचा नेहरू आणि लेडी माऊंटबॅटन. चाचा नेहरू यांची हि प्रेमकथा एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. आज रोज डेच्या निमित्तानेच चाचा नेहरू यांची प्रेमकथा जाणून घेऊयात.
देश स्वातंत्र्य झाला तरी भारत पाकिस्तान हा तिढा सुटला नव्हता. अशावेळी भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय म्हणून लॉर्ड माउंटबॅटन भारतात आले. त्यांच्यासोबत मुलगी पामेला आणि पत्नी एडविना भारतात आल्या. एडविना नेहरूंच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या मैत्रीला सुरूवात झाली.
नेहरू यांच्या सतत संपर्कात आल्याने त्यांचे नाते मैत्रीच्या पुढे जाऊ लागले. नेहरू यांचे सचिव के एफ रुस्तमजी आपल्या डायरीत लिहितात की नेहरू आणि एडविना यांचे संबंध अभिजात होते. दोघांच्या आवडीनिवडी देखील सारख्याच होत्या. दोघांना एकमेकांविषयी आपुलकी होती. नेहरू भारतातील ब्रिटिश होते तर एडविना ब्रिटनमधील भारतीय होत्या. यातूनच त्यांचे संबंध बहरले होते.
जोपर्यंत नेहरू जिवंत होते, तोपर्यंत ते एडविना यांना पत्र लिहियचे. ब्रिटनमध्ये जाऊन भेटायचे. दर वर्षी एडविनाही भारतात यायच्या. आल्यावर पंतप्रधान यांच्या तीन मूर्ती या निवासस्थानी सरकारी पाहुण्या म्हणून राहायच्या, असे सांगितले जाते.
नेहरू आणि एडविना दोघेही फार एकाकी आयुष्य जगले. नेहरु त्यांच्या पत्नी कमला यांच्या निधनानंतर एकटे पडले होते. लेडी माउंटबॅटन यांची वेगळी परिस्थिती नव्हती. त्यांचे पती एक व्यस्त अधिकारी होते, तर त्या स्वतःत व्यग्र असणाऱ्या, फार लोकांत न मिसळण्याऱ्या अशा होत्या.
भारतात नेहरूंच्या रुपात त्यांना एक उत्तम असा साथीदार मिळाला होता, ज्याच्याशी त्यांची चांगली गट्टी जमली होती. दोघांमध्ये सतत संवाद घडायचा. नेहरू आणि एडविना यांचे सतत भेटण्याला अनैतिकतेची किनार जोडली गेली.पण, त्यांच्यात आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं. असं खुद्द एडविना यांची कन्या पामेला यांनीच स्पष्ट केले आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबॅटन या दोघांमध्ये प्रेमसंबंधांबाबत अनेक दावे, प्रतिदावे केले जातात. पण त्यावर पामेला यांनी मोकळेपणाने भाष्य केले होते. 'माझी आई आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात प्रेम संबंध असले, तरी त्यांचे शारीरिक संबंध कधीही नव्हते, असे त्या म्हणाल्या होत्या.
'माझ्या आईला आत्मिक समानता, बुद्धिमत्ता खूपच आवडत असे. हे सगळे गुण तिला पंडित नेहरू यांच्यामध्ये आढळून आले', असेही पामेला यांनी स्पष्ट केले आहे. दोघांच्या संबंधांबाबत पामेला यांना आणखी जाणून घेण्याची इच्छा होती. परंतु, पंडित नेहरू आपल्या आईवर कशा प्रकारे प्रेम करत होते, तसेच ते कशा प्रकारे तिचा आदर राखत होते हे आपण आपल्या आईला पंडित नेहरू यांनी लिहिलेल्या पत्रांवरून जाणवले असे पामेला यांनी म्हटले आहे.
भारतात सुव्यवसस्था आणल्यावर जेव्हा एडविना यांना देश सोडून जावे लागले. तेव्हा ते त्यांच्यासाठी हृदयद्रावक होते, असे त्यांची मुलगी पामेला म्हणते. त्यांनी असेही सांगितले की, जाण्यापूर्वी त्यांनी एक अतिशय सुंदर आणि महागडी हिऱ्याची अंगठी इंदिरा गांधी यांना दिली.
नेहरू हे श्रीमंत कुटुंबातून आले असले तरी त्यांनी त्यांच्याकडे जे काही होते ते देशासाठी दान केले होते. एडविनाने इंदिराजींना सांगितले की, ती नेहरूंना ही अंगठी देत नाहीत कारण ते घेणार नाहीत. जर कधी त्यांना पैशाची गरज भासली तर ही अंगठी विकून टाका.
एडविना यांच्यानंतरही अनेक महिलांचा चाचा नेहरू यांच्या जीवनात प्रवेश झाला. नेहरूंचे सचिव के.एफ. रुस्तम यांची डायरी संपादित होऊन त्याचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्यात त्यांनी असे लिहीले आहे की, नेहरू यांचे बऱ्याच महिलांशी जवळचे संबंध होते. या महिला बुद्धिमान होत्या. सरोजनी नायडूंची मुलगी पद्मजा त्यांच्या जवळ होती. प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाईंचाही उल्लेख आहे. पुढे जाऊन त्यांनी वैज्ञानिक होमी जहांगिर भाभांशी मृणालिनी यांनी लग्न केलं. त्या नेहरूंच्या खूप जवळ होत्या. त्यानंतर श्रद्धा माता यांचाही नेहरूंच्या जीवनात वावर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.