नवी दिल्ली : कोरोनाचं थैमान सध्या जगभर थैमान घालत आहे. अद्यापही कोरोनावर प्रभावी औषध सापडलेलं नाहीये. मात्र कोरोना प्रतिबंधक लशी उपलब्ध झालेल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट भारतात धुमाकूळ घालून गेली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यता अनेकांनी वर्तवल्या आहेत. मात्र, या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचा निर्वाळा अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवरच केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोरोनाबाधित मुलांची काळजी घेण्यासाठी केंद्राकडून काही महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, ज्यांनी कोरोनामुळे आपल्या आईवडिलांना गमावलं आहे, अशा 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना 'आयुष्यमान भारत'अंतर्गत 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मोफत दिला जाईल. आणि त्याचे प्रीमियम पीएम केअरद्वारे दिले जाईल, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट केलंय.
सध्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना व तरुणांना अधिक धोका असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, ही लाट येण्यापूर्वी लहान मुलांमध्ये संसर्ग होत आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी यासाठी आयुष मंत्रालयाने अलिकडेच मार्गदर्शन केलं आहे. या गाईडलाईनमध्ये आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांसोबत मास्क वापरणे, योग करणे, डॉक्टरांच्या संपर्कात राहणे असे काही सल्ले देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.