RSS Chief in Maharashtra :आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांचं एक वक्तव्य समोर येत आहे. ज्यात त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. सध्याच्या काळात फक्त अन्न, वस्त्र आणि निवाराचं नव्हे तर आरोग्य आणि शिक्षणही आजच्या समाजासाठी महत्वाचं झालंय, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी चांगल्या गोष्टींची जास्त चर्चा होत आहे, असेही मत व्यक्त केले.
मोहन भागवत यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उत्तर मुंबईतील कांदिवली भागात धनकुवरबेन बाबूभाई ढाकन हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यासाठी आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणाले की देशात ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यांच्या चर्चा, देशात घडणाऱ्या वाईट गोष्टींपेक्षा ४० पट होत आहेत. त्याचबरोबर ते म्हणाले की सध्याच्या काळात फक्त अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरचं शिक्षण आणि आरोग्यही आजच्या समाजासाठी महत्वाचं बनतं चाललंय.
दवाखान्याच्या उद्घाटनाच्यावेळी संबोधित करताना ते म्हणाले की,"बऱ्याच वेळा नकारात्मक चर्चा ऐकायला मिळतात. पण आम्ही जेव्हा देशभरात फिरत असतो, तेव्हा आम्हाला माहिती पडतं की भारतामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टींच्या तुलनेत चांगल्या गोष्टी जास्त घडतं आहेत. त्यांची चर्चा ४०पट जास्त होत आहे."
यापुढे ते म्हणाले की आज देशाच्या उत्कर्षाचं कारण केंद्र सरकारच्या योजना आणि केंद्र सरकारमध्ये असणारे जबाबदार लोकं आहेत.त्याचबरोबर ते हेही म्हणाले की काही गोष्टी यामुळे देखील चांगल्या घडतं आहेत, कारण काही लोक काम करत नाहीत, जर त्यांनी काम केलं तर अडचणी निर्माण होतील.
भागवत म्हणाले की भारताला वैभव प्राप्त करताना बघतानाची इच्छा ४० वर्ष आधीच्या तुलनेत आता जास्त आहे. आपण प्रगतीपथावर आहोत,पण अजूनही फारसे शक्तीशाली नाहीत. ते हेही म्हणाले की असे काही लोक आहेत ज्यांना आपली प्रगती बघवत नाही.
भागवत पुढे म्हणाले की आज फक्त अन्न, वस्त्र आणि निवाराचं नव्हे तर शिक्षण आणि आरोग्यही आजच्या समाजासाठी महत्वाचं आहे.
ते म्हणाले की चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरवण्याचा निकष काय आहे ? एक गोष्ट अशी आहे जी की दिसते आणि एक गोष्ट अशी असते जी की वास्तवात घडत आहे. कोणी या गोष्टीला असंही दाखवू शकतं जशी ही गोष्ट करण्यात आलेली आहे, जरी ती करण्यात आलेली असेल किंवा नसेल.
ते म्हणाले की आमच्या बाबतीत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे चांगलं काम करणे आणि हे दाखवणं की चांगली कामं करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.