नरेंद्र मोदी RSS चे स्वयंसेवक आहेत, पण..; पंतप्रधानांबाबत मोहन भागवतांचं मोठं विधान

सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (Narendra Modi) महत्त्वपूर्ण विधान केलंय.
Mohan Bhagwat Narendra Modi
Mohan Bhagwat Narendra Modiesakal
Updated on
Summary

सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (Narendra Modi) महत्त्वपूर्ण विधान केलंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (Narendra Modi) महत्त्वपूर्ण विधान केलंय. भागवत यांनी सांगितलं की, 'पीएम मोदी हे संघाचे स्वयंसेवक आहेत. परंतु, संघ स्वतंत्रपणे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत नाही.'

Mohan Bhagwat Narendra Modi
G20 Summit : नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानाचं अमेरिकेकडून तोंडभरुन कौतुक, असं काय म्हणाले पंतप्रधान?

सरसंघचालकांनी जबलपूरमध्ये (Jabalpur) लोकांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मोहन भागवत म्हणाले, 'जेव्हा कोणी आरएसएसबद्दल बोलतो, तेव्हा लोक विश्व हिंदू परिषदेचा (विहिप) विचार करतात. त्या संघटनेतही स्वयंसेवक आहेत आणि त्यांची विचारसरणीही तशीच आहे, असं मानतात. संघ म्हटल्यावर लोक मोदीजींचं नाव घेतात. मोदीजी आमचे स्वयंसेवक आहेत. संघात तुम्हाला विश्व हिंदू परिषद दिसते. विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक आहेत. त्यांचे विचार आणि मूल्ये स्वयंसेवकांसारखीच आहेत. परंतु, ही सर्व स्वयंसेवकांनी केलेली स्वतंत्र कामं आहेत. ही संघटन नाहीये.'

Mohan Bhagwat Narendra Modi
Shraddha Murder Case : 'असं कृत्य एखाद्या हिंदूनं केलं असतं तर आतापर्यंत देशात दंगली उसळल्या असत्या'

संघाचं वेगळं आणि स्वतंत्र कार्य : भागवत

संघाचं एक वेगळं आणि स्वतंत्र काम आहे. स्वयंसेवक सर्वत्र आहेत, म्हणून एक कनेक्शन आहे जे चांगल्या कृत्यांना मदत करतं. त्यामुळं संघाचं त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण नाही. हिंदू धर्म हा धर्म नसून जीवनपद्धती आहे. ही एक परंपरा आहे जी विविध पंथ, जाती आणि प्रांतांनी जपली आहे, असंही भागवतांनी स्पष्ट केलं. छत्तीसगडला भेट देऊन आणि तेथील आरएसएस कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर भागवत चार दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी जबलपूरला पोहोचले. त्यांनी शुक्रवारी महाकौशल भागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()