RSS नं गावोगावी जाऊन गोळा केल्या 'चड्ड्या'; काँग्रेसविरोधात सुरु केली 'ही' मोहीम

Chaddi Campaign in Karnataka
Chaddi Campaign in Karnatakaesakal
Updated on
Summary

काँग्रेसनं भगवेकरणाच्या निषेधार्थ खाकी चड्डी जाळण्याची मोहीम सुरू केलीय.

बंगळुरू : आरएसएसचे कार्यकर्ते खाकी चड्डी घालत असतात. मात्र, काँग्रेसनं (Congress) भगवेकरणाच्या निषेधार्थ खाकी चड्डी जाळण्याची मोहीम सुरू केलीय. या मोहिमेच्या निषेधार्थ RSS कार्यकर्त्यांनी आता घरोघरी जावून चड्ड्या गोळा (Chaddi Campaign) करण्यास सुरुवात केलीय. या चड्ड्या गोळा करुन आरएसएस कार्यकर्ते बंगळुरूमधील (Bangalore) काँग्रेस मुख्यालयात पाठवणार आहेत. शिवाय, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना ह्या चड्ड्या भेट म्हणूनही दिल्या जाणार आहेत.

मंड्या जिल्ह्यातील (Mandya District) केआर पेटमधील RSS कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्यांच्या राज्यभर खाकी चड्डी जाळण्याच्या आवाहनाचा निषेध करत खाकी चड्ड्यांचं पार्सल त्यांना पाठवलंय. आरएसएस कार्यकर्त्यांनी दावा केलाय की, विरोधी नेत्यांना आम्ही इतक्या चड्ड्या पाठवू, की ते कधीच जाळू शकणार नाहीत. दरम्यान, कार्यकर्त्यांनी गावोगावी-घरोघरी जाऊन चड्ड्या गोळा करण्याचं काम सुरु केलंय. सध्या शेकडो चड्ड्या एका बॉक्समध्ये पॅक करून बंगळुरू काँग्रेस कार्यालयात पाठवल्या आहेत.

Chaddi Campaign in Karnataka
भाजप प्रवक्त्यांच्या वक्तव्यानं 14 देश संतप्त; देशासह विदेशातही वाढता विरोध

'आरएसएस ही राष्ट्रवादी संघटना आहे'

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलंय की, 'काँग्रेस आरएसएसच्या विरोधात बदनामीची मोहीम चालवत आहे, पण जनतेला सर्व काही माहित आहे. RSS ही समाजसेवेत गुंतलेली देशभक्त, राष्ट्रवादी संघटना आहे. आपत्तीच्या काळात लोकांना वाचवण्यात आणि बाधित लोकांची सेवा करण्यात संघाचे कार्यकर्ते आघाडीवर असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अनेक राज्यांमध्ये कौतुकास्पद काम केलंय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.