RSS on BJP : ''ज्यांच्यात अहंकार होता त्यांना २४१ वर रोखलं, जे रामविरोधी होते त्यांना तर...'' आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचं मोठं विधान

''ज्या पक्षाने प्रभू श्रीरामाची भक्ती केली त्या पक्षाला आता २४१वर अडून बसावं लागलं आहे. दुसरीकडे ज्यांना प्रभू श्रीरामाबद्दल जराही आस्था नाही त्यांना सगळ्यांना मिळून २३४ वर रोखलं. लोकशाहीमध्ये रामराज्याचं विधान बघा, अहंकारी लोकांना देवाने मोठा पक्ष बनवलं परंतु ताकद दिली नाही.''
RSS on BJP : ''ज्यांच्यात अहंकार होता त्यांना २४१ वर रोखलं, जे रामविरोधी होते त्यांना तर...'' आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचं मोठं विधान
Updated on

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन भाजपवर आसूड ओढला आहे. त्यांनी सत्तारुढ भाजपला अहंकारी आणि विरोधी इंडिया आघाडीला रामविरोधी म्हटलं आहे.

इंद्रेश कुमार म्हणाले की, प्रभू श्रीराम हे सर्वांसोबत न्यायाने वागतात. २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यांनी रामाची भक्ती केली त्यांच्यात हळूहळू अहंकार निर्माण झाला, त्यांना सगळ्यात मोठा पक्ष बनवलं खरं.. पण त्यांचा पूर्ण हक्क त्यांना दिला नाही. त्यांची शक्ती देवाने रोखली.

इंद्रेश कुमार पुढे म्हणतात, ज्यांनी रामाचा विरोध केला, त्यांना देवाने अजिबातच ताकद दिली नाही. सर्वांनी मिळूनदेखली नंबर एकपर्यंत पोहोचता आलेलं नाही. त्यामुळेच देवाचा न्याय विचित्र असतो, सत्य असतो.

गुरुवारी इंद्रेश कुमार हे जयपूरजवळील कानोतामध्ये रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन समारंभात बोलत होते. इंद्रेश हे आरएसएसचे कार्यकारी सदस्य आहेत. वास्तविक त्यांनी आपल्या भाषणात थेटपणे कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही. परंतु त्यांच्या रोख भाजप आणि इंडिया आघाडीकडे होता.

RSS on BJP : ''ज्यांच्यात अहंकार होता त्यांना २४१ वर रोखलं, जे रामविरोधी होते त्यांना तर...'' आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचं मोठं विधान
Dr. Suhas Palshikar : आघाड्यांचे राजकारण गुंतागुंतीचे;राजकीय विश्‍लेषक डॉ. सुहास पळशीकर यांचे मत

भाजपला उद्देशून इंद्रेश म्हणाले की, ज्या पक्षाने प्रभू श्रीरामाची भक्ती केली त्या पक्षाला आता २४१वर अडून बसावं लागलं आहे. दुसरीकडे ज्यांना प्रभू श्रीरामाबद्दल जराही आस्था नाही त्यांना सगळ्यांना मिळून २३४ वर रोखलं. लोकशाहीमध्ये रामराज्याचं विधान बघा, अहंकारी लोकांना देवाने मोठा पक्ष बनवलं परंतु ताकद दिली नाही.

RSS on BJP : ''ज्यांच्यात अहंकार होता त्यांना २४१ वर रोखलं, जे रामविरोधी होते त्यांना तर...'' आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचं मोठं विधान
Besan Paneer Sandwich: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा बेसण पनीर सँडविच, जाणून घ्या रेसिपी

''प्रभू राम भेदभाव करत नाहीत आणि शिक्षाही देत ​​नाहीत. राम कोणाला त्रास देत नाहीत.. राम सर्वांना न्याय देतात. प्रभू राम कायम न्यायी आहेत आणि नेहमीच न्यायी असतील. रामाने लोकांचे रक्षण केले आणि रावणाचेही भले केले.'' असंही इंद्रेश कुमार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.