RSS On BJP: 'भाजपला अहंकारी' म्हणणाऱ्या संघाच्या वरिष्ठ नेत्याचा यू-टर्न; म्हणाले, 'रामाचा संकल्प...'

BJP arrogant Said Indresh Kumar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) इंद्रेश कुमार यांनी भारतीय जनता पक्ष अहंकारी असल्याची बोचरी टीका केली होती.
Indresh Kumar
Indresh Kumar
Updated on

नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) इंद्रेश कुमार यांनी भारतीय जनता पक्ष अहंकारी असल्याची बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता त्यांनी यावर यू-टर्न घेतला आहे. ज्यांनी प्रभु रामाचा संकल्प घेतला ते आता सत्तेत आहेत, असं ते म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन इंद्रेश कुमार यांनी भाजपला अहंकारी झाल्याचं म्हटलं होतं. तसेच इंडिया आघाडीवर देखील टीका केली होती. विरोधी पक्ष रामविरोधी असल्याचं ते म्हणाले होते. मात्र ते आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत.

Indresh Kumar
RSS on BJP : ''ज्यांच्यात अहंकार होता त्यांना २४१ वर रोखलं, जे रामविरोधी होते त्यांना तर...'' आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचं मोठं विधान

शुक्रवारी इंद्रेश कुमार यांनी वेगळं वक्तव्य केलं. त्यांनी भाजपचं कौतुक केलं. ज्यांनी रामाला विरोध केला ते सत्तेबाहेर फेकले गेले. पण, ज्यांनी रामाजी बाजू घेतली, त्यांचा संकल्प पूर्ण केला ते आता सत्तेमध्ये आहेत. श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होईल असा विश्वास प्रत्येकांमध्ये निर्माण झाला आहे. आमची इच्छा आहे की हा विश्वास वाढत राहो आणि त्याला गोड फळे यावेत, असं ते म्हणाले आहेत.

Indresh Kumar
Assembly Elections 2024: भाजप खरंच विधानसभा स्वबळावर लढणार? अजित पवारांना दूर ठेवण्यासाठी सर्व्हे? अधिकृत माहिती वाचा

इंद्रेश कुमार यांनी नेमकी काय टीका केली होती?

रा. स्व. संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपवर अहंकारी असल्याची टीका केली. तसेच, विरोधी पक्षही 'रामविरोधी' असल्याची टीका त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केली. इंद्रेश कुमार हे संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. जयपूर येथे झालेल्या 'रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन समारंभात बोलताना इंद्रेश कुमार यांनी पक्षांवर नाव न घेता टीका केली होती.

इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यावरून त्यांचा अंगुलीनिर्देश भाजपकडे होता हे स्पष्ट होते. ते म्हणाले होते, "ज्या पक्षाने रामाची भक्ती तर केली, पण अहंकारामुळे त्यांना २४१ पर्यंतच थांबावे लागले आणि ज्यांचा रामावर विश्वासच नाही, ते सर्वजण मिळून २३४ वरच अडकले.

लोकशाहीतील हा रामराज्याचा न्याय आहे. रामाचे भक्त असूनही ते अहंकारी बनले. ज्यांनी रामाला विरोध केला, त्यांना कोणालाही सत्ता मिळाली नाही. ते सर्व एकत्र आले तरी ते दुसऱ्या क्रमांकावरच राहिले. देवाचा न्याय हा खरा आणि मजेशीर आहे.' जे रामाचे भक्त आहेत, त्यांनी विनम्र असावे. जे रामविरोधी आहेत, त्यांच्याकडे रामच पाहून घेईल, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.