नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेच्या वादात सापडलेले उद्योगपती गौतम अदानीयांच्याविरूध्द काही विदेशी संस्था व देशातील डावे पत्रकार यांनी कारस्थान रचून त्यांची बदनामी चालविल्याचे मतप्रदर्शऩ संघपरिवाराने केली आहे. पत्रकारांचा नामोल्लेख करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघपरिवाराच्या साप्ताहिक 'ऑर्गनायझर'ने अदानींच्या टीकाकारांवर 'नव्यानेच उगवलेले डिजिटल शार्पशूटर्स' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.
अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूह नकारार्थी अर्थाने चर्चेत आहे. या प्रकरणी विरोधकांनी संसदेत चर्चेसाठी कामकाज रोखून धरले आहे. या प्रकरणी काही भारतीय पत्रकारांनी परदेशी अनुदानित स्वयंसेवी संस्थांकडून आणि त्यांच्या भारतीय भागीदारांकडून (एनजीओ आणि मीडिया हाऊस) पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
'ऑर्गनायझर' ने हिंडेनबर्ग संशोधन अहवालाचे वर्णन 'सुनियोजित आणि समन्वित हल्ला' असे केले आहे. अदानीवरील हल्ल्यामागे ऑस्ट्रेलियासह विदेशातील आणि भारतातील काही स्वयंसेवी संस्थांसह देशातील डाव्या विचारसरणीच्या पत्रकारांना जबाबदार धरण्यात आले आहे.
द वायर, द कॅरव्हान, ऑल्टन्यूज, न्यूजक्लिक सारख्या प्रचार वेबसाइटद्वारे अशा 'नवीन डिजिटल शार्पशूटर्स'ची भरती केली जाते आणि त्यांचे काम राष्ट्रवादी संघटना आणि व्यक्तींना लक्ष्य करणे, त्यांची बदनामी आहे, असा गंभीर आरोपही 'ऑर्गनायझर' च्या लेखात करण्यात आला आहे.
हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर अदानी समूहावरील हल्ला २५ जानेवारी २०२३ पासून सुरू झाला नसून २०१६-१७ मध्ये ऑस्ट्रेलियातूनच सुरू झाल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. ऑस्ट्रेलियातील पर्यावरण समस्यांवर काम करणाऱ्या बॉब ब्राउन फाऊंडेशन (बीबीएफ) या एनजीओचाही ताज्या प्रकरणात मोठा हात असल्याचा आरोप त्रिकाने केला आहे.
या संस्थेच्या संकेतस्थळातर्फे ‘अदानीवॉच.ओआऱजी‘ नावाचे वेगळे संकेतस्थळच चालविते ज्याचा एकमेव उद्देश अदानींच्या ब्रँड प्रतिमेला नुकसान पोहोचविणे हाच आहे असाही दावा या लेखात केला गेला आहे.
टाइड्स फाऊंडेशनकडून निधी घेणाऱया किमान ३५० भारतीय एनजीओंचाही या प्रकरणात सहभाग आहे असे सांगून लेखात म्हटले आहे की अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल फाऊंडेशन फॉर इंडिया ही संस्था राष्ट्रवादी विचारांच्या विरोधातील विविध 'प्रचार' न्यूज वेबसाइट्सना थेट निधी देते.
यात सहभागी पत्रकारांमध्ये द वायरच्या संपादक सीमा चिश्ती, द न्यूज मिनीटचे सह-संस्थापक धन्या राजेंद्रन, न्यूजक्लिकचे प्रबीर पुरकायस्थ, द पॅट्रियट या यूट्यूब चॅनलचे आकाश बॅनर्जी, तसेच अजित अंजुम, अभिसार शर्मा, एफ डिसूझा आणि आलोक जोशी आदी पत्रकारांचाही या ‘टोळीत' ('कार्टेल') सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्वामींचा दावा
केवळ अदानी समूहाच्या सुमारे साडेचार लाख कोटी रुपये इतका प्रचंड नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए) म्हणजे बुडीत कर्जांचा बोजा देशातील बँकांवरआहे, असा दावा माजी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की बँकांवर आता केवळ अदानींचा साडेचार लाख कोटी रुपयांचा एनपीए आहे. तरीही २०१६ पासून त्यांची संपत्ती दर दोन वर्षांनी दुप्पट होत आहे. तो बँकांची थकबाकी का भरत नाहीत?
त्यांंनी विमानतळे खरेदी केली त्याचप्रमाणे ते आता ज्या सरकारी बँकांची कर्जे थकीत आहेत त्यांचीही खरेदी करतील अशीही भिती स्वामी यांनी बोलून दाखविली. दरम्यान अदानी यांनी स्वामींनी दिलेल्या आकडेवारीचे वर्णन 'चुकीचे आणि काल्पनिक' असे केले आहे. बँकांकडून कर्ज न फेडल्याचा आरोपही अदानी उद्योगसमूहाने शनिवारी फेटाळून लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.