सोशल प्रोफाइलवर तिरंगा का नाही? टीकेनंतर RSS ने दिलं स्पष्टीकरण

National Flag
National Flag
Updated on

नागपूर : देशात सध्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत असून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच आपल्या सोशल मीडियावर प्रोफाईलवर भारताच्या राष्ट्रध्वजाचा फोटो लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो बदलण्यात आले नव्हते. यावरून नेटकऱ्यांनी आरएसएसला ट्रोल केलं होतं. आता आरएसएसकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. (RSS news in marathi)

National Flag
मोफत सुविधांमुळे नव्हे मित्रांना फ्री लाभ दिल्याने आर्थिक संकट; 'आप'चा टोला

आरएसएसने म्हटलं की, अशा गोष्टींचे राजकारण केले जाऊ नये. आरएसएसने 'हर घर तिरंगा' आणि 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमांना आधीच पाठिंबा दिला आहे. संघाने जुलैमध्ये लोकांना आणि स्वयंसेवकांना या कार्यक्रमांना पूर्ण पाठिंबा आणि सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. सरकार, खाजगी संस्था आणि संघाशी संबंधित संघटनांनी अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, असं आवाहन केल्याचंही आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले.

National Flag
Har Ghar Tiranga Abhiyan: प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये फक्त 25 रुपयात मिळणार मोठा तिरंगा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतरही RSS.org आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचे चित्र न टाकल्यामुळे आरएसएसला ट्रोल करण्यात आले होते. यावर आंबेकर यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच असे मुद्दे आणि कार्यक्रम राजकारणापासून दूर ठेवले पाहिजेत, असंही त्यांनी नमूद केलं.

यापूर्वी, 'मन की बात'मध्ये, पंतप्रधान मोदींनी लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचे प्रोफाइल चित्र तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रवृत्त करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.