''ज्या जाती मागे राहिल्या आहेत त्यांचा उत्कर्ष व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले जाणे आवश्यक असून त्यासाठी सरकारकडे आकडेवारी असणे आवश्यक आहे.''
पलक्कड : ‘‘जातिनिहाय जनगणना हा अत्यंत संवेदनशील विषय असून, समाजाच्या कल्याणासाठी जातिनिहाय जनगणना (Caste Wise Census) करायला हरकत नाही पण त्याचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जाऊ नये,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने (RSS) सोमवारी व्यक्त करण्यात आले.