RSS यंदा पहिल्यांदाच आयोजित करणार इफ्तार पार्ट्या; बडे नेते होणार सहभागी

RSS Muslim Rashtriya Manch
RSS Muslim Rashtriya Manchesakal
Updated on
Summary

इफ्तार पार्ट्या आणि ईद मिलाफचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करायचे, अशी संघाची योजना आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) येत्या रमझान (Ramadan 2022) महिन्यात देशात इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करणार आहे. संघ परिवाराचाच घटक असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचनं (Muslim Rashtriya Manch) त्यासाठी पुढाकार घेतलाय. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये रमजान महिन्यातल्या पहिल्या वीस दिवसांमध्ये या पार्ट्या आयोजित करण्यात येतील, तर नंतरचे 10 दिवस आरएसएस ईद मिलापचा कार्यक्रम असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संस्थापक नेते डॉ. इंद्रेश कुमार (Dr. Indresh Kumar) यांनी ही माहिती दिल्याचं वृत्तसंस्थांनी म्हंटलंय.

रमझानमध्ये ठिकठिकाणी इफ्तार पार्ट्या (Iftar Party) आणि ‘ईद मिलाफ’चे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करायचे, अशी संघाची योजना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित मुस्लीम राष्ट्रीय मंच एप्रिलमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करणार आहे. देशभरात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जाणार आहे. ज्यामध्ये मोठे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या (PTI) माहितीनुसार, मुस्लीम राष्ट्रीय मंचाचा प्रत्येक कार्यकर्ता रमजानच्या पवित्र महिन्यात कमीत कमी एक दिवस इफ्तारचं आयोजन करणार आहे.

RSS Muslim Rashtriya Manch
दोन डोकी, तीन हात.. महिलेनं दिला अनोख्या बाळाला जन्म

रमझान हा मुस्लिमांसाठी (Muslim) पवित्र महिना मानला जातो. मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर इफ्तार पार्टीच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आलीय. रमझानच्या महिन्यात कार्यकर्त्यानं किमान एक दिवस इफ्तारचं आयोजन करावं, असं मंचानं सांगितल्याचं वृत्त आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंच या इफ्तारमध्ये संघाच्या नेत्यांबरोबरच समाजाच्या विविध घटकांतील प्रतिष्ठीत व्यक्तींना निमंत्रित करून शांती आणि बंधुभावाचा संदेश देणार आहे. इंद्रेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात नुकतीच एक बैठकही झालीय. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंचाचे प्रवक्ते शाहीद सईद (Shahid Saeed) यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.