नवी दिल्लीः पुण्याकडे निघालेल्या गर्लफ्रेंडला थांबवण्यासाठी एका गुलहौशाने चक्क विमान थांबवलं. तेही बॉम्बची अफवा पसरवून. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी प्रवाशी भलते घाबरले होते.
दिल्ली ते पुणे या विमानाने एका तरुणाची गर्लफ्रेंड प्रवास करणार होती. स्पाईसजेटचं हे विमान होतं. या विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणांनी कसून तपासणी केल्यानंतर अफवा असल्याचं निष्पन्न झालं.
हेही वाचाः सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
दिल्ली पोलिसांनी बनावट या प्रकरणाचा छडा लावला आहे. मित्राला मदत करण्यासाठी आरोपीने हे कृत्य केलं. आरोपीच्या मित्राच्या गर्लफ्रेंडला पुण्याला जायचं होतं. मात्र तिला रोखण्यासाठी त्याने विमानात बॉम्ब असल्याची आवई उठवली.
आरोपीने मित्रांसोबत प्लॅन बनवून स्पाईसजेटच्या कॉल सेंटरला फोन लावला होता. गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजता स्पाईसजेटला हा फोन करण्यात आला. बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर विमानाचं उड्डाण थांबवलं गेलं. सुरक्षा यंत्रणांनी तपास घेतला मात्र काहीही आढळून आलं नाही.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून प्रकरणाचा खुलासा झाला. यामध्ये आरोपी असलेला तरुण ब्रिटिश एअरवेजचा प्रशिक्षणार्थी कर्मचारी आहे. विमानात बॉम्ब असल्याच्या माहितीने सुरुवातीला सगळेच घाबरले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.