नवी दिल्ली : जवळपास ५० भारतीय आताही युक्रेनमध्ये आहेत. त्यातील काहीच जण मायदेशी परतण्यास तयार आहेत. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी (Minakshi Lekhi) यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. त्यांना परत आणण्यास दुतावास सुविधा उपलब्ध करुन देत आहे. मंत्री म्हणाले, की गेल्या महिन्यापासून २२ हजार ५०० भारतीय युद्धग्रस्त युक्रेनमधून देशात परतले आहेत. युद्धग्रस्त युक्रेन (Ukraine) आणि त्या सीमेवरील देशांमधून भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहिम राबवण्यात आली होती. जेव्हा २०२० मध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक झाला, तेव्हा केंद्र सरकारने भारतीयांना देशात आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरु केले. भारत (India) आणि ३५ इतर देशांदरम्यान प्रवासाच्या सुविधेसाठी एअर बबल बनवले गेले होते. (Russia Ukraine War 50 Indians Are Still In Urkaine Government Giver Information In Rajya Sabha)
एअर बबल व्यवस्था दोन देशांदरम्यान एक अस्थायी करार होता. त्याचा उद्देश व्यापारी प्रवास पुन्हा सुरु करणे हा होता. मंत्री लेखी यांनी राज्यसभेत माहिती देताना म्हणाल्या, की 'वंदे भारत मिशन' आणि एअर बबल अंतर्गत आतापर्यंत सुरु असलेल्या उड्डाणांमधून जवळपास २.९७ कोटी प्रवाशांना सुविधा दिली गेली आहे.
तालिबान सत्तेत आल्यावर अफगाणिस्तानातून भारतीय आणि परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सशस्त्र दलांनी ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत ६६९ लोकांना बाहेर काढण्यात आले. यात ४४८ भारतीय नागरिक, २०६ अफगाण आणि इतर देशात नागरिक १५ आदींचा समावेश होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.