नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) 21व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेसाठी आज भारतात येणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहेत. भारत आणि रशियामधील लष्करी संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही पुतिन आणि मोदींमध्ये चर्चा होणार आहे.
मोदी आणि पुतिन यांची भेट खूप महत्वाची मानली जात आहे. या बैठकीत भारत आणि रशियामध्ये पहिल्यांदाच टू प्लस टू फॉर्मेटवर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमधील महत्त्वाचे द्विपक्षीय मुद्दे, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थितीसह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पुतीन यांनी गेल्या आठवड्यातच सांगितले होते की रशिया-भारत संबंध अधिक विकसित करण्यासाठी त्यांना पंतप्रधान मोदींशी विशेष चर्चा करायची आहे.
भेटीत काय होणार?
2019 मध्ये ब्राझिलिया येथे BRICS देशांच्या शिखर परिषदेच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यातील ही पहिली भेट आहे. संरक्षण, व्यापार, अंतराळ, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि संस्कृती या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी या शिखर परिषदेदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षरी करण्याची माहिती आहे. या दौऱ्यात पुतीन एस-400 हवाई संरक्षण प्रणालीचे मॉडेल पीएम मोदींना सुपूर्द करतील. भारतामध्ये An-203 रायफलच्या निर्मितीसाठी सुमारे 5100 कोटी रुपयांचा मोठा आणि महत्त्वाचा करार दोन्ही देशांदरम्यान होण्याची शक्यता आहे. या रायफल्स उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये बनवण्यात येणार आहेत.
AK-203 रायफल भारतीय सैन्यात समाविष्ट केलेल्या तीन दशकांहून अधिक जुन्या इनसास- INSAS रायफलची जागा घेईल. भारतीय लष्कराला 7.5 लाख एके-203 रायफल मिळतील अशी अपेक्षा आहे. AK-203 असॉल्ट रायफल करारावर काही वर्षांपूर्वी दोन्ही बाजूंनी सहमती झाली होती आणि आता तंत्रज्ञान हस्तांतरणातील समस्या सोडवणे हा प्रमुख मुद्दा असेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.