मॉस्को : रशियन बनावटीची सिंगल डोस स्पुटनिक लाइट व्हॅक्सीन (लस) ७९.४ टक्के कार्यक्षम असून ती सर्व प्रकारच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी आहे, असा दावा रशियातील स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मात्यांनी केला आहे. त्याचबरोबर जगातील इतर डबल डोस लसींच्या कार्यक्षमतेपेक्षाही स्पुटनिकच्या या सिंगल डोस लसीची कार्यक्षमता खूपच अधिक असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
सिंगल डोस स्पुटनिक लाइट ही लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी केलेल्या पडताळणीतील डेटावरुन ही लस सुमारे ८० टक्के कार्यक्षम (७९.४) असल्याचा दावा रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने केला आहे. स्पुटनिकची ही कार्यक्षमता इतर अनेक दोन डोस लसींच्या कार्यक्षमतेपेक्षा खूपच जास्त असल्याचंही RDIF नं म्हटलं आहे.
कार्यक्षमतेबाबत कसा काढला निष्कर्ष?
जगातील सध्याच्या सर्व नव्या स्ट्रेन्सवरही सिंगल डोस स्पुटनिक लाइट ही लस प्रभावी आहे, असं रशियातील लॅबमधील चाचणीतून समोर आलं आहे. ज्या नागरिकांना ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ या काळातील रशियातील सार्वत्रिक लसीकरण मोहिमेदरम्यान पहिला डोस घेतला आणि त्यानंतर काही कारणांमुळे त्यांना दुसरा डोस घेता आला नाही, अशा लोकांच्या शरिरावर या लसीचा काय परिणाम झाला याच्या डेटावरुन या लसीच्या कार्यक्षमतेबाबतचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
स्पुटनिक लाइट लसीचा फायदा काय?
स्पुटनिक लाइट या लसीच्या केवळ एकाच डोसमुळे कोविडच्या संसर्गामुळे रुग्ण गंभीर होऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्याच्या शक्यतेचं प्रमाण कमी झालं. या लसीमुळे कमी वेळेत अनेक लोकांच्या प्रतिकारशक्ती तयार होण्याच्या अडचणी दूर झाल्या. कोरोनाच्या सर्वाधिक संसर्गाच्या काळात लोकांमध्ये वेगानं हर्ड इम्युनिटी तयार झाली, असं RDIF चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल मित्रिव्ह यांनी सांगितलं.
लसीला सध्या केवळ रशियातच परवानगी
दरम्यान, सिंगल डोस स्पुटनिक लाइट लसीला सध्या फक्त रशियातच आपात्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. २१ फेब्रुवारी रोजी गॅमेलिया सेंटर आणि RDIF यांनी मिळून स्पुटनिक लाइटच्या कार्यक्षमतेबाबतचा अहवाल जाहीर केला होता. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये ७,००० लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रशिया, युएई आणि घाना या देशातील लोकांचा समावेश होता.
आत्तापर्यंत किती जणांनी घेतला डोस
RDIF नं सांगितलं की, स्पुटनिक लाइट लस ही ह्युमन अॅडनोव्हायरल व्हेक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित असून त्यामुळे ती सुरक्षित आणि कार्यक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. ५ मे २०२१ पर्यंत जगभरातील २० मिलियन पेक्षा अधिक लोकांनी या लसीचा पहिला डोस घेतला आहे.
स्पुटनिक लाइट लसीची किंमत किती ?
रशियाच्या या स्पुटनिक लाइट लसीची जागतीक किंमत ही १० अमेरिकन डॉलरपेक्षाही कमी आहे. तसेच या लसीसाठी प्लस २ प्लस ८ अशा साध्या स्टोरेजची गरज असते, यामुळे याची वाहतूक करणंही सोप जातं. ही सिंगल डोस लस असल्याने ती कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर देता येऊ शकते. यामुळे वेगानं कोरोनावर नियंत्रण मिळवता येते.
स्पुटनिक लाइटचे दोन डोसही घेता येतात?
स्पुटनिक लाइट या लसीचे दोन डोसही घेता येतात, दुसऱ्या डोसनंतर यामुळे मोठ्या प्रमाणावर आणि वेगात कार्यक्षमतेत वाढ होते. दुसरा डोस हा बुस्टर डोस असतो, अशी माहिती गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर ग्लिंट्सबर्ग यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.