Ruvin Dholakiya : 12 हजार कोटींच्या मालकाने नातवाला विकायला लावले कपडे, हॉटेलमध्ये बनला वेटर !

ओळख उघड न करण्याचे होते आदेश
Ruvin Dholakiya
Ruvin Dholakiya sakal
Updated on

Ruvin Dholakiya : गुजरातच्या सुरत येथील 12 हजार कोटी रुपयांचे मालक असलेले सुप्रसिद्ध हिरे व्यवसायिक सावजीभाई ढोलकिया हे नेहमीच चर्चेत असतात. दिवाळीच्या बोनस म्हणून कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार किव्वा घर देण्यासाठी ते परिचित आहेत. मात्र आता ते वेगळ्याच विषयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

यंदा ते पुन्हा चर्चेत यायचं कारण म्हणजे त्यांचा नातू रुविन ढोलकीया. तो अमेरिकेतून एमबीए करून परतला असतानाही ढोलकीया यांनी आपल्या नातवाला सर्वसामान्य माणसाचे जीवन जगण्यासाठी थेट चेन्नईला पाठवले. एमबीए करताना तो जे बिजनेस स्कूलमध्ये शिकला त्याचा वापर त्याला आपल्या आयुष्यात करता यायला हवा. असा या मागचा उद्देश होता.

Ruvin Dholakiya
Navi Mumbai : नवी मुंबईत 'या' ठिकाणी १२ तास होणार पाणी कपात

स्वतःच्या आजोबांच्या सांगण्यावरून रुविन ढोलकीया 30 जून रोजी चेन्नईला रवाना झाला. यावेळी त्याची ओळख उघड न करण्याचे आदेश देण्यात आले होते. मोबाईल फोन वापरण्यासही नकार देण्यात आला होता. त्याला केवळ सहा हजार रुपयांची रक्कम दिली होती.

Ruvin Dholakiya
Mumbai Dam News : मुंबईकरांना दिलासा; सातही तलावांमध्ये 80 टक्के पाणीसाठा

कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा वारसदार असणारा रुबीन आठ दिवस भोजनगृहात काम करत होता. या ठिकाणी त्याने वेटरचे सुद्धा काम केले. पुढे एका वॉच आउटलेट मध्ये त्याने नऊ दिवस सेल्समन म्हणून काम केले. याचबरोबर त्याने घड्याळ दुरुस्ती करण्यातही मदत केली.

Ruvin Dholakiya
Nashik Crime: लग्नानंतर पळून गेलेल्या नववधूला अटक; मध्यस्थीह चौघांची पोलिस कोठडीत रवानगी

रुबींची शेवटची नोकरी बॅग आणि सामानाच्या दुकानात होती. या ठिकाणी त्याने दोन दिवस मजूर म्हणून काम केले.

Ruvin Dholakiya
Mumbai Crime : कुख्यात गुंड नवीन केशवानी याला उत्तर प्रदेशातील बनारस येथून अटक...

यावेळी ३० दिवस त्याने अशेच काढले. या 30 दिवसात त्याने चार वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. ८० हून अधिक वेळा त्याच्या नशिबी नकार आला. दररोज दोनशे रुपये भत्त्यावर तो जगत होता. एका सध्या वसतिगृहात तो राहत होता. अनेकदा तो केवळ एकच वेळेस जेवला.

Ruvin Dholakiya
U Mumba चा दिमाखदार खेळ; Bengaluru Bulls विरुद्ध विजयी सलामी

या विषयी बोलतांना रुविनने सांगितले कि, ते 30 दिवस तो एक संधी म्हणून पाहत होता. ज्यावेळेस त्याला नोकरीसाठी नकार मिळाला त्यावेळेस त्याला 'नाही' या शब्दाची वेदना समजली. हॉटेलमध्ये वेटरच्या नोकरीच्या काळात त्याला 27 रुपयांची टीप मिळाली होती. तो क्षण त्याच्यासाठी सर्वात खास होता. ते 27 रुपये त्याला कोटी रुपये इतके वाटत होते.

Ruvin Dholakiya
Mumbai Crime News : चहाचे पैसे देण्यास मित्राने नकार देताच केला चाकूनं वार

नोकरी सोडताना जेव्हा हॉटेल मालकांनी पगारासाठी त्याला सहा तास उभे करून दोन हजार रुपये त्याच्यासमोर फेकले तेव्हा त्याला कष्टकरी लोकांसोबत वागण्याचा धडा समजला. पिशवीच्या दुकानात मजूर म्हणून काम करत असताना तो दहा दहा तास जमिनीवर बसून काम करत होता. त्यावेळी त्याला कामाचे महत्त्व समजले.

Ruvin Dholakiya
Mumbai-Pune Expressway : 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर कंटेनर पलटला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प

यावेळी रुविनने त्यांनी देवाचे आभार मानले की देवाने त्याला अशा कुटुंबात जन्म दिला तिथे त्याला चांगले शिक्षण आणि संगोपन मिळाले. या 30 दिवसाच्या प्रवासामध्ये रुविनने आठ हजार सहाशे रुपये कमवले.३० जुलै रोजी त्याचा हा प्रवास संपला. तो परतल्या नंतर कुटुंबीयांनी एका रिसेप्शनचे आयोजन केले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.