Delhi : 'रॉ'च्या अधिकाऱ्याची 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, कारण...

rwa officer commits suicide dead after jump from office 10th floor he was depressed
rwa officer commits suicide dead after jump from office 10th floor he was depressed
Updated on

नवी दिल्ली: नॅशनल इंटेलिजेंस एजन्सी रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) च्या अधिकाऱ्याने सोमवारी आपल्या कार्यालयाच्या 10व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, तो गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. मात्र, याबाबत अद्याप स्पष्टपणे काहीही माहिती समोर आलेली नाही. RAW अधिकाऱ्याच्या मृत्यूची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे. RAW अधिकारी त्यांच्या कामाबाबत नैराश्यात होते की त्यांच्या काही कौटुंबिक समस्या होत्या ज्यामुळे ते नैराश्यात होते? याबाबत आत्तापर्यंत काहीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान हा आधिकारी कार्यालयाच्या 10व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तो थेट जमिनीवर पडला. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सध्या रॉ अधिकाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. रॉ अधिकाऱ्याने कार्यालयात असे पाऊल उचलल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे काम करणारे इतर लोकही अचंबित झाले होते.

rwa officer commits suicide dead after jump from office 10th floor he was depressed
Delhi Murder Case: Dating App, लिव्ह इन.. शेवटी ३५ तुकडे; वसईच्या तरुणीच्या हत्येचा असा झाला उलगडा

सीबीआय अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला

या वर्षी सप्टेंबर महिन्यात एका सीबीआय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. सीबीआयच्या कायदेशीर सल्लागाराचा मृतदेह त्यांच्या दक्षिण दिल्लीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. सीबीआयच्या लोधी रोड कार्यालयात उप कायदेशीर सल्लागार म्हणून तैनात जितेंद्र कुमार हे मूळचे हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले. मृत्यूनंतर एक सुसाईड नोटही सापडली होती. यामध्ये आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार नसल्याचे म्हटले होते.

rwa officer commits suicide dead after jump from office 10th floor he was depressed
Jitendra Awhad: आव्हाडांना अटकेपासून दिलासा! ठाणे कोर्टाने दिले महत्वाचे आदेश

IRS अधिकाऱ्याने आत्महत्या केली

त्याचप्रमाणे 2020 मध्ये एका IRS अधिकाऱ्याने दिल्लीत गळफास लावून आत्महत्या केली होती. दिल्लीतील चाणक्यपुरी भागात राहणारे आयआरएस अधिकारी आयकर कार्यालयात मुख्य आयुक्त म्हणून तैनात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.