United Nations: दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावले

S Jaishankar
S Jaishankar esakal
Updated on

नवी दिल्ली : दहशतवादावरून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला खडसावलं आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि रक्तपातास समर्थन करणाऱ्या देशांच्या वक्तव्याला खपवून घेतले जाणार नाही असं संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत परराष्ट्र मंत्र्याने चीन आणि पाकिस्तानला ठामपणे सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या साधारण अधिवेशनात ते बोलत होते.

(Foreign Affairs Minister S. Jayshankar on Pakistan And China Terrorism)

"भारत अनेक वर्षापासून अशा गोष्टी सहन करत आला आहे. आमच्या मते कुणीही दहशतवादाला समर्थन देणे चुकीचे आहे. त्याचबरोबर दहशतवादाच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन आपण करू शकत नाही. कारण दहशतवादाला समर्थन म्हणजे रक्तपाताला समर्थन होय" असं जयशंकर म्हणाले. अनेक दशकांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया आम्ही सहन करत आलोय. त्यामुळे आम्ही कोणत्याही दहशतवादी कारवाईचे समर्थन करत नसल्याचं परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

S Jaishankar
Raigad Fort : रायगडावरील शिवसमाधीजवळ पिंडदानाचा कार्यक्रम? घटनेचा Video Viral

भारत, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य मित्र देशांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी चीनकडून अडथळा आणला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या आणि भारताने सह-समर्थित केलेल्या प्रस्तावाला चीनने विरोध केला आहे. या प्रकारावरून एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर बोट ठेवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.