Home Minister Amit Shah Meets PM Modi reshuffle between Center and BJP
Home Minister Amit Shah Meets PM Modi reshuffle between Center and BJPEsakal

Lok sabha Election 2024 : 'चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी भाजपचा पराभव अटळ!', सामनातून टीकास्त्र

कधीही निवडणुका घ्या, हुकूमशाही रूपी हिरण्यकश्यपूचा पराभव अटळ असल्याचीही टीका
Published on

आगामी निवडणुकींच्या दृष्टीकोनातून सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. अशातच भाजप विरोधी पक्षांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली. त्यानंतर देशात घडामोडींना वेग आला आहे. इंडिया आघाडीची आगामी बैठक ही मुंबईत पार पडणार आहे. विरोधी पक्षाचे देशभरातील महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत. बैठकांची तयारी जोरदार सुरू असतानाच दुसरीकडे मात्र ठाकरे गटाने भाजपवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

चांद्रयानावरून प्रचार केला तरी…भाजपचा पराभव निश्चित असल्याचा दावा ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे. 2023 ला किंवा 2024… कधीही निवडणुका घ्या, चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी हुकूमशाही रूपी हिरण्यकश्यपूचा पराभव अटळ आहे, असं सामनातून म्हटलं आहे.

Home Minister Amit Shah Meets PM Modi reshuffle between Center and BJP
Sanjay Pandey News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना मोठा दिलासा! सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल

'2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाही रूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. ‘इंडिया’ आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही.'(Latest Marathi News)

'प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे भाजपने देशातील सर्व विमाने , हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहेत . आम्ही म्हणतो , त्यांना हवे ते करू द्या . त्यांनी ‘ चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे . त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आणलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे . त्यांना राजयोग नव्हताच . ओढून – चोरून आणलेला सत्तायोग होता . तो आता संपल्यात जमा आहे.'

Home Minister Amit Shah Meets PM Modi reshuffle between Center and BJP
Fire News: पिंपरी चिंचवडच्या चिखलीमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; होरपळून ४ जणांचा मृत्यू

आणखी काय लिहलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार हे आता ब्रह्मदेव तरी सांगू शकेल काय? हा प्रश्नच आहे. हरण्याच्या भीतीने निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असा नवा ‘अ-लोकतांत्रिक’ पायंडा भाजप व त्यांच्या फुटीर महामंडळींनी पाडलेला दिसतो. पण लोकसभा निवडणुका मात्र वेळेच्या आधीच, म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा प. बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी केला आहे.(Latest Marathi News)

निवडणुकीच्या प्रचारासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत देशभरातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक करण्यास सुरुवात झाली आहे. खासगी, छोटी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचे बुकिंग करून आपल्या राजकीय विरोधकांना कोंडीत पकडायचे. निवडणूक प्रचारासाठी कोणतीच वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरू असलेला सत्तेचा हा गैरप्रकार निषेधार्ह आहे.

Home Minister Amit Shah Meets PM Modi reshuffle between Center and BJP
Devendra Fadnavis : अजित पवारांना धक्का! भाजप नेत्यांना दिलासा देत फडणवीसांनी बदलला १५ दिवसांपूर्वीचा 'तो' निर्णय

भाजपकडे व त्यांच्या पाठीराख्यांकडे अमर्याद साधनसंपत्ती आहे. ही संपत्ती कशा पद्धतीने येते याचे एक साधे उदाहरण आम्ही देतो. ‘चांद्रयान 3’ मोहिमेचा एकूण खर्च किती झाला? तर 650 कोटी रुपये आणि दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वेच्या 3 किलोमीटर रस्त्याचा खर्च 750 कोटींवर गेल्याचे उघड झाले.(Latest Marathi News)

जे काम फार तर 75 कोटींत व्हायला हवे ते 750 कोटींवर गेले. मग मधल्या पाचशे कोटींचा हिशेब कोठे गेला? ते भाजपच्या तिजोरीत गेले की भाजप पुरस्कृत ठेकेदाराच्या खिशात? हा झाला फक्त 3 किलोमीटरचा हिशेब. त्या 3 किलोमीटरमागे 500 कोटींची फावडेबाजी करणाऱ्यांनी निवडणूक प्रचारासाठी देशातील सर्व खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवली तर त्यात नवल ते कसले?

पुन्हा भाजपचे खासदार डी. अरविंद यांनी सांगितलेच आहे की, ‘ईव्हीएम’चे कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच पडत असते. याचा अर्थ असा की, सर्व हेलिकॉप्टर्सबरोबर लाखो ‘ईव्हीएम’ही भाजपने बुक करून ठेवलीत. त्याबाबतही त्यांचा वेगळा खर्च आणि हिशेब असणारच. अर्थात तुम्ही कितीही काहीही बुक केले तरी यावेळी मतदार भ्रष्ट ईव्हीएमच्या छाताडावर पाय ठेवून हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.