लोकशाहीसाठी काँग्रेस मजबूत असणे आवश्यक आहे. काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी अशी आपली इच्छा आहे, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचे काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र युनिटचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सोमवारी (ता. २८) गडकरींना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा सल्ला दिला. (Congress leader Sachin Sawant give Advised to Nitin Gadkari)
लोकशाही दोन चाकांवर चालते. एक सत्ताधारी आणि दुसरा विरोधक. प्रबळ विरोध ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस (congress) मजबूत असावी हीच माझी इच्छा आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका खूप महत्त्वाची असते. कमकुवत काँग्रेस म्हणजे मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत. हे चांगले लक्षण नाही, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हणाले होते.
सचिन सावंत यांनी गैर-भाजप शासित राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा त्यांच्या सरकारांना त्रास देण्यासाठी होत असलेल्या कथित गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचे आम्ही कौतुक करतो. परंतु, त्यांनी भाजप, विरोधी पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे लोकशाही नष्ट करण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे नेते मोदीजी यांच्याशीही बोलले पाहिजे, असेही सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले.
ते लोकशाही, देशाच्या हिताचे होईल
सुप्रीम कोर्टही असहाय्य वाटत आहे. तुम्ही गैर-भाजप पक्षांच्या सरकारांना त्रास देण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहात. आठ वर्षांपासून असे राजकारण सुरू आहे. विरोधी पक्ष नष्ट करण्याच्या आणि लोकशाहीला हुकूमशाहीत रूपांतरित करण्याच्या भाजपच्या मानसिकतेबद्दल नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोदींशी चर्चा केल्यास ते लोकशाही आणि देशाच्या हिताचे होईल, असेही सचिन सावंत म्हणाले.
...हे आपल्याला माहीत नाही
मोदी (Narendra Modi) सरकार देशातील लोकशाहीची कशी पायमल्ली करू पाहत आहे, हे आपल्याला माहीत नाही. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसची विचारधारा आणि विचार देशहिताचे आहेत हे लोकांना कळेल, असेही सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.