दोन वर्षांनंतर PM नरेंद्र मोदी आईच्या भेटीला; सचिन सावंत म्हणतात..

Sachin Sawant s reaction to PM Narendra Modi s meeting with his mother Hiraben Modi
Sachin Sawant s reaction to PM Narendra Modi s meeting with his mother Hiraben Modi sakal
Updated on

भाजपने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत दमदार कमगीरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरात दौऱ्यावर असताना तब्बल दोन वर्षांनी त्यांच्या आईची भेट घेतली. दरम्यान सचिन सावंत यांनी, "माझी आई माझ्या घरी राहते. म्हणून माझ्या आईला मी दररोज भेटतो.." अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

मोदी यांनी गांधीनगरमधील निवासस्थानी आईसोबत जेवणसुद्धा केलं. याआधी ते ऑक्टोबर २०१९ मध्ये आई हिराबेन यांना ते भेटले होते. त्यांनी पाच राज्यात झालेल्या निवडणूकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वादही घेतले.

या दरम्यान, पंतप्रधानांच्या या भेटीवरुन कॉंग्रेसचे सचिन सावंत यानी निशाणा साधला आहे, त्यांनी "माझी आई माझ्यासाठी विश्व आहे. माझी आई माझ्या घरी राहते. म्हणून माझ्या आईला मी दररोज भेटतो अस म्हटले आहे, पुढे त्यांनी लिहिले आहे की, मी माझ्या आईला भेटल्याशिवाय आणि आईला माझ्याशी भेटल्याशिवाय चैन पडत नाही, इतकेच नाही तर सावंत यांनी 'मी कॅमेरा वाल्यांना घेऊन आईला भेटत नाही.' असं देखील सुनावलं आहे

Sachin Sawant s reaction to PM Narendra Modi s meeting with his mother Hiraben Modi
यूपीमध्ये तब्बल 80% नेत्यांचे डिपॉझिट जप्त; काँग्रेस सगळ्यात पुढे

उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर मोदींनी गुजरातमध्ये मतदारांशी संवाद साधण्यासाठी १० किमी रोड शो केला. या वेळी म्हणाले की, गुजरात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी आहे. गांधीजींना ग्रामीण विकास आणि गावांना आत्मनिर्भर बनवायचं होतं. ग्राम स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी पंचायतराज व्यवस्था मजबूत करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

Sachin Sawant s reaction to PM Narendra Modi s meeting with his mother Hiraben Modi
'नाटो अन् रशिया भिडले तर…'; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा गंभीर इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.