रिहाना अँड कंपनीला सचिनचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'!

Sachin_Rihanna
Sachin_Rihanna
Updated on

Farmers protest: मुंबई : जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि क्रिकेटचा देव अशी ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरने पॉप सिंगर रिहाना आणि कंपनीला चांगलाच रिप्लाय दिला आहे. शेतकरी आंदोलनावर हॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी ट्विट केल्यानंतर भारतातील अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले तर काहींनी हा आमचा अंतर्गत प्रश्न असून तुम्ही यामध्ये लक्ष्य घालण्याची काहीएक गरज नाही, असं खडसावून सांगणाऱ्यांचीही रांग लागली. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या यादीत आला आहे.

शेतकरी आंदोलन प्रकरणी कालपासून सोशल मीडियात रान उठले आहे. सचिनने बुधवारी (ता.३) आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करताना म्हटले आहे की, भारतीय सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विदेशी ताकदींनी यापासून दूर राहावे. 

पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची असलेली पॉप स्टार रिहाना आणि इतर ख्यातनाम व्यक्तींनी नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यावर सचिनने प्रत्युत्तर दिले आहे. सचिन म्हणाला, 'भारतीय सार्वभौमत्वाशी तडजोड करू शकत नाही. परदेशी लोक केवळ याकडे लक्ष देऊ शकतात, पण त्यांनी सहभागी होऊ नये. भारताला भारतीय चांगल्याप्रकारे ओळखतात. आणि भारताबाबतचा निर्णय भारतीय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजुटीने उभे राहूया.' 

या संदर्भात अनेक परदेशी सेलिब्रिटींनी ट्विट केल्यानंतर भारतीयांनीही प्रतिक्रिया देण्यास पवित्रा घेतला आहे. सत्य जाणून न घेता घाईघाईत व्यक्त होणे टाळावे, असा सल्लाही परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.