IPS Sadanand Vasant Date NIA DG : मराठमोळ्या अधिकाऱ्यावर मोदी सरकारने दिली मोठी जबाबदारी; महाराष्ट्र ATS चे प्रमुख सदानंद दातेंकडे एनआयए’ची सूत्रे

IPS Sadanand Vasant Date NIA DG : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
IPS Sadanand Vasant Date NIA DG
IPS Sadanand Vasant Date NIA DG Esakal
Updated on

नवी दिल्ली: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी अतुलनीय शौर्य दाखविले होते. या कामगिरीसाठी त्यांचा राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात आला होता.

भारतीय पोलिस सेवेतील १९९०च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या दाते यांनी महाराष्ट्र पोलिस दलात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिस दलातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. मुंबईला लागून असलेल्या वसई-विरार तसेच मीरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. दाते यांनी केंद्रात सीबीआय तसेच सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर सेवा बजावली आहे. दाते यांना त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे २०२६ सालापर्यंत ‘एनआयए’चे महासंचालक म्हणून काम पाहता येईल.

IPS Sadanand Vasant Date NIA DG
Dr. Neelam Gorhe : महिलांचे प्रश्‍न आता येताहेत केंद्रस्थानी ; डॉ. नीलम गोऱ्हे

सदानंद दाते यांची केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) DG पदावर नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने सदानंद दाते आणि इतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये नियुक्त्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.

दाते यांनी आत्तापर्यंत भूषवलेली महत्त्वाची पदं

सदानंद दाते, महाराष्ट्र एटीएसचे विद्यमान प्रमुख (एनआयएचे डीजी म्हणून नियुक्ती होईपर्यंत), त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये डीआयजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये आयजी (ऑप) म्हणूनही काम पाहिलं आहे. मुंबईजवळील मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांचे पोलीस आयुक्तपदही त्यांनी भूषवलेलं आहे.

IPS Sadanand Vasant Date NIA DG
BJP : भाजपकडून चाळीस जणांची यादी जाहीर

कोण आहेत सदानंद दाते?(Who is Sadanand Date)

सदानंद दाते गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ पोलीस सेवेत कार्यरत आहेत. आपल्या अनुभवांवर त्यांनी 'वर्दीतील माणसांच्या नोंदी' हे पुस्तक देखील लिहलेलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी पोलीस सेवेत जायचा निर्णय घेतला. यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आयएएस, आयपीएस आणि IA&AS असे तीन पर्याय होते. सदानंद दातेंनी आयपीएस हा पर्याय निवडला आणि पोलीस खात्यात रूजू झाले.

IPS Sadanand Vasant Date NIA DG
V. K. Saxena : तुरुंगातून सरकार चालू शकत नाही; नायब राज्यपालांची केजरीवालांवर टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.