Sadhguru Jaggi Vasudev: जग्गी वासुदेव यांच्या पायांच्या फोटोंची किंमत ३ हजार २०० रुपये; वेबसाईट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल

Isha Foundation: ईशा फाऊंडेशनमध्ये महिलांना राहण्यासाठी 'ब्रेनवॉश' केले जात असल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिस चौकशी सुरु आहे. निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण पुढे आले आहे. ईशा फाऊंडेशनच्या आश्रमामध्ये 150 पोलिसांनी छापा टाकून तपास सुरु केलाय.
Sadhguru Jaggi Vasudev: जग्गी वासुदेव यांच्या पायांच्या फोटोंची किंमत ३ हजार २०० रुपये; वेबसाईट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल
Updated on

नवी दिल्लीः पोलिस कारवाईमुळे सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनच्या वेबसाईटवरील एका फोटोने वाद उभा राहण्याची शक्यता आहे. यात सद्गुरूंच्या पायांचे फोटो 3,200 रुपयांना विकले जात असल्याचं व्हायरल स्क्रीनशॉटवरुन दिसून येतंय.

"सद्गुरु पदम् फोटो" या शीर्षकाखाली जग्गी वासुदेव यांच्या फोटोंची विक्री होत आहे. वेबसाईटचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोंवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सद्गुरुंबद्दल असलेल्या आदर आता गमावला आहे, अशा आशयाच्या कमेंट्स येत आहेत.

ईशा फाऊंडेशनमध्ये महिलांना राहण्यासाठी 'ब्रेनवॉश' केले जात असल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिस चौकशी सुरु आहे. निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण पुढे आले आहे. ईशा फाऊंडेशनच्या आश्रमामध्ये 150 पोलिसांनी छापा टाकून तपास सुरु केलाय.

Sadhguru Jaggi Vasudev: जग्गी वासुदेव यांच्या पायांच्या फोटोंची किंमत ३ हजार २०० रुपये; वेबसाईट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल
Brij Bihari Prasad Murder Case: माजी मंत्र्याच्या हत्येप्रकरणी, माजी आमदाराला जन्मठेप तर माजी खासदाराची निर्दोष मुक्तता

याचिकाकर्ते निवृत्त प्राध्यापक एस.कामराज यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या दोन मुली कुटुंबाशी संपर्क न ठेवता ईशा फाऊंडेशनच्या कोईम्बतूर केंद्रात राहत आहेत. त्यावर फाऊंडेशनने आपली बाजू मांडली आहे. ''ईशा फाऊंडेशनने कोणतेही चुकीचे कृत्य केले नसून केंद्रातील व्यक्तींसाठी त्यांच्या निवडी आणि स्वातंत्र्य अबाधित आहे." अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये दावा केलाय की, सद्गुरुंचे पाय पूज्य आहेत.. भक्तांचे गुरुशी नाते घट्ट व्हावे, यासाठी ते मदत करतात. असं सांगून त्या फोटोंची विक्री होत आहे. मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी याची चेष्टा केली. आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतकी घसरली आहे की, सद्गुरुंच्या पायांचे फोटो विकावे लागत आहेत. असं एका युजरने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.