Sahara Refund Portal: सहारा रिफंड पोर्टल सुरु, गुंतवणूकदारांना मिळाले त्यांचे पैसे

सहारा गुंतवणूकदारांचा अनेक वर्षांची प्रतिक्षा आता संपली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी ११२ लाभार्थ्यांच्या खात्यात १०,००० रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे.
Sahara Refund Portal
Sahara Refund Portalesakal
Updated on

सहारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची अनेक वर्षांची प्रतिक्षा आता संपली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी ११२ लाभार्थ्यांच्या खात्यात १०,००० रुपयांचा पहिला हप्ता जमा केला आहे. अमित शाह यावेळी म्हणाले की क्लेम पोर्टलवर १८ लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते.

सहारा क्रेडिट कॉऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कॉऑपरेटिव्ह आणि स्टार मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेडमध्ये अडकलेल्या गुंतवणूकदारांना सरकारने सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर पैसे परत केले जात आहेत.

सरकार आधीच्या गुंतवणूकदारांना ५००० कोटी रुपये परत आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह १८ जुलैला पोर्टल लॉंच करत म्हणाले होते की १ कोटी गुंतवणूकदारांना पैसे परत केले जाणार आहेत. शाह म्हणाले की अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील. (Latest marathi News )

Sahara Refund Portal
Supreme Court to Rahul Gandhi: शिक्षेला स्थगिती दिली पण कोर्टाने राहुल गांधींचे कान देखील टोचले

रिफंडसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?

  1. अर्जदारांनी सर्वात आधी https://mocrefund.crcs.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन कराव लागेल.

  2. त्यानंतर त्याठिकाणी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावं लागेल. आधार सलंग्न केलल्या क्रमांकावर जो ओटीपी येईल तो टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करावे. त्यानंतर लॉग इन करुन घ्यावं.

  3. त्यानंतर आपल्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक टाकून ओटीपी जनरेट करावा आणि तो टाकावा. 'मी सहमत आहे 'या ठिकाणी क्लीक करा आणि लक्षात ठेवा की तुमचे बॅंक खात्याची माहिती आणि जन्म दिनांक त्या ठिकाणी आली पाहिजे.

  4. त्यानंतर क्लेम रिक्वेस्ट फॉर्म भरुन सोसायटी डिटेल्स टाका.योग्य माहिती भरल्यानंतर पार्टलवरुन त्यांना क्लेम लेटर डाऊनलोड करता येईल. यावर पासपोर्ट साईज चिकटवून सही करावी. त्यानंतर हे लेटर अपलोड करा . प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर संदेश येईल. (Latest marathi News )

Sahara Refund Portal
Rahul Gandhi Breaking News : राहुल गांधींना खासदारकी बहाल! मोदी आडनाव प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिली शिक्षेला स्थगिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()