सायनाच्या राजकीय ट्विटवर तिखट 'ड्रॉप शॉट'

सायनाने ट्विटच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंद केले आहे.
Yogi Adtiyanath and Saina Nehwal
Yogi Adtiyanath and Saina NehwalE Sakal
Updated on

उत्तर प्रदेशमधील राजकीय निकालानंतर भारतीय स्टार शटलर सायना नेहवाल चर्चेत आलीये. UP तील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तारुढ भाजप पक्षाचा अध्यक्ष विजयी झाल्यानंतर सायना नेहवालने एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून सायनाने (Saina Nehwal) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे अभिनंदन केले आहे. ही गोष्ट राष्ट्रीय लोक दल (रालोद) चे अध्यक्ष जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांना खटकली आहे. (Saina Nehwal Congratulates Yogi On Bjp Win In UP Local Polls RLD Chief Calls Her Sarkari Shuttler)

सायनाने शनिवारी रात्री उत्तर प्रदेशमधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल अभिनंदन ट्विट केले होते. सायनाच्या या ट्विटनंतर रालोद अध्यक्ष जयंत चौधरी यांनी ट्विटच्या माध्यमातून तिखट प्रतिक्रिया दिलीये. बॅडमिंटनमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दाचा वापर करुन त्यांनी सायनावर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की; 'सरकारी शटलर जनादेशाला झुगारुन सत्तेत येणाऱ्या भाजपच्या क्षमतेच कौतुक करत आहे. मतदारांना भूलवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सेलिब्रिटींविरोधात कडक 'ड्रॉप शॉट' (बॅडमिंटनच्या खेळात नेटला लागून प्रतिस्पर्ध्याच्या बाजूला चतुराईन मारलेला फटका) मारण्याची गरज आहे, अशा आशयाचा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आलाय.

Yogi Adtiyanath and Saina Nehwal
MPSC विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर फडणवीसांची प्रतिक्रिया

75 पैकी 67 जागेवर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना यश

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या 53 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा दावा केलाय. निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या 22 जागांपैकी 21 जागा या भाजपच्याच होत्या. या निवडणुकीत 75 पैकी 67 जिल्ह्यात विजय मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी एक ट्विट करत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील यशाबद्दल आनंद व्यक्त केला. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकी मिळालेले ऐतिहासिक यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याणकारी रणनितीचा कौल असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.

गुजरातमधील बारावी पास मुलाने 40 देशातील 25 हजार लोकांना गंडवलं

समाजवादी पक्षाकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी बळाचा वापर करुन अनेक मतदारांचे अपहरण करण्यात आले. अनेक मतदारांना मतदान करण्यापासून वंचित ठेवून भाजपने यश मिळवले आहे, असा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आलाय. पंचायत समितीच्या निवडणुकी सर्वाधिक जागा या समाजवादी पक्षाला मिळाल्या होत्या. जिल्हा परिषदेचा निकाल आश्चर्यकारक असाच आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.