राष्ट्रीय तपास एजन्सी आणि दहशतवादी विरोधी पथकाकडून राज्यभरात ४४ ठिकाणी तर कर्नाटकात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये १५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय. या प्रकरणामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेत. आता त्या पुन्हा निवडणूक लढू शकतात का? संसदेतील या प्रकरणात कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळू शकतो का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर. द कंट्री ऑफ ब्लाइंड या चित्रपटाला ऑस्कर 2024 साठी नामांकन मिळालंय. ऑस्कर लायब्ररीतही द कंट्री ऑफ ब्लाइंडने स्थान मिळवलंय.अत्यंत कमी वयात आतापर्यंत तीन विश्वविक्रम करणारा नागपूरचा चिमुकला कराटेपटू राघव भांगडे हा आणखी एक विक्रम करणार आहे. याविषयी थोडक्यात ऐकुयात. मनोज जरांगेंनी फडणवीसांना काय इशारा दिलाय हे आजच्या चर्चेतील बातमीमध्ये ऐकणार आहोत.
1. NIAच्या छापेमारीत घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत
2. खासदारकी गेल्यानंतर आता मोइत्रा निवडणूक लढवू शकतात का?
3. बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यासाठी ब्रिटनचा सर्वात मोठा निर्णय!
4. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक उलथापालथींना तोंड देण्यास सक्षम!
5. भारतात अॅपल बनवणार वर्षाला 5 कोटी आयफोन! 6. हिना खानच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड'ची ऑस्करमध्ये एंट्री!
7. विश्वविक्रमवीर राघव दोन्ही हातांवर शंभर मीटर चालणार!
8. भुजबळांच्या दबावाखाली येऊ नका, अन्यथा पश्चाताप होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
..............
स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.