Sakal Survey 2024: हिंदुत्व नाही तर लोकसभेसाठी हा मुद्दा महत्त्वाचा; 'सकाळ' सर्व्हेतून उघड झाला मतदारांचा कौल

loksabha election 2024 maharashtra : सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीने एक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मूड नेमका काय आहे, याचा अंदाज घेण्यात आला आहे.
Sakal Survey
Sakal SurveyEsakal
Updated on

Sakal Survey- लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. देशात कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळेल याबाबत उत्सुकता असणार आहे. त्याआधी सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीने एक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मूड नेमका काय आहे, याचा अंदाज घेण्यात आला आहे.

लोक कोणत्या मुद्द्यांना जास्त महत्त्व देतात. कोणत्या मुद्द्यावरुन लोक मतदान करतात हे सकाळ सर्वेमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीला मतदान करताना पंतप्रधान पदाचा उमेदवार या मुद्द्याला सर्वाधिक (२१.४%) तर पक्ष (१२.९%), नेत्यांनी केलेली कामे (११.६%), पूर्ण झालेली विकास कामे (१०.१%) या मुद्द्यांना मतदार सर्वाधिक प्राधान्य देताना दिसतात. (sakal survey loksabha election 2024 maharashtra issue value most)

Sakal Survey
Sakal Survey Loksabha 2024: सेनेचं मतदान घटणार... पण ठाकरेंना होणार फायदा! शिंदेंच काय? 'सकाळ'च्या सर्व्हेत मोठी माहिती समोर...

लोकसभा निवडणुकीला जात; धर्म यांचा परिणाम थेट होत नाही असे मतदारांचा सर्वेक्षण कल सांगतो; पण अनेक ठिकाणी याचा परिणाम गेल्या अनेक निवडणुकांच्या निकालावेळी दिसून आलेला आहे. हिंदुत्व या मुद्द्यांपलिकडे पंतप्रधान पदाचा चेहरा, पक्ष, पक्षाच्या विकासाचा अजेंडा आणि उमेदवार असे इतरही मुद्दे महत्वाचे वाटतात.

sakal survey
sakal surveyEsakal

कोणत्या मुद्द्याला प्राध्यान्य दिले जाते?

हिंदूत्व- ३.२ टक्के

पंतप्रधान पदाचा चेहरा- २१.४ टक्के

मतदारसंघात आलेला निधी- २.१ टक्के

पक्ष-विकास अजेंडा/ जाहीरनामा- ९.३ टक्के

विकास कामे- १०.१ टक्के

सांगता येत नाही- ८.५ टक्के

उमेदवाराची जात- १.२ टक्के

स्थानिक उमेदवाराची लोकप्रियता- ८.१ टक्के

नेत्यांनी केलेली कामे- ८.१ टक्के

वरीलपैकी सर्व- ९.६ टक्के

Sakal Survey
Sakal Survey 2024 : मविआ की महायुती? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र कुणासोबत? 'सकाळ' सर्व्हेतून उघड झाला मतदारांचा कौल

जनतेचा कौल कुणाला?

लोक कोणत्या पक्षाला पसंती देतील याबाबत सर्व्हेक्षण करण्यात आला होतो. यात लोकांची भारतीय जनता पक्षाच्या युतीला म्हणजे एनडीएला एकूण ४३.३ टक्के पसंती मिळाली आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीला लोकांची अधिक पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. इंडिया आघाडी/ महाविकास आघाडीच्या पारड्यात लोकांनी ४५.७ टक्के पसंती टाकली आहे. अपक्षांना ३.७ टक्के आणि १०.३ टक्के जनतेने कोणताच पर्याय निवडलेला नाही. (Latest Marathi News) (Know who the people support?)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.