मुंबई : काळवीट प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार जीवेमारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर सलमानसाठी मै हँ ना!अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. या पोस्टनंतर बिश्नोई गँगकडून या नेत्याला धमकी मिळाली आहे. .Swapna Patkar: संजय राऊतांवर गंभीर आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर निवडणुकीच्या रिंगणात; 'या' मतरसंघातून दाखल करणार अर्ज .पप्पू यादव असं या नेत्याचं नाव असून बिहारच्या पूर्णियातू तो अपक्ष खासदार म्हणून निवडून आला आहे. या खासदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी एका ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यामध्ये म्हटलं की, तुमच्या प्रत्येक हालचालींवर आमचं बारीक लक्ष आहे. बॉलिवूड कलाकार सलमान खानशी संबंधित प्रकरणापासून तुम्ही दूर राहावं अन्यथा तुम्हालाही जीव गमवावा लागेल, अशा शब्दांत पप्पू यादव यांना बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे..पप्पू यादव यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी म्हटल होतं की, "मी मुंबईतून परत येतोय. शहरापासून दूर शुटिंगमध्ये व्यस्त असल्यानं अभिनेता सलमान खान यांची भेट होऊ शकली नाही. त्यांना मी अश्वस्त करु इच्छितो की, त्यांनी काळजी करु नये 'मै हँ ना'! सलमानशी फोनवरुन बोलणं झालं, ते निडर आणि निर्भीड आहेत. त्यांनी आपलं काम आणि माणुसकीला प्राथमिकता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक परिस्थितीत मी सोबत आहे.".Assembly Election: पवारांची ५७ वर्षांची परंपरा युगेंद्र पवार सुद्धा पाळणार! काय आहे कान्हेरी मारुतीचे बारामतीच्या निवडणुकीशी कनेक्शन? .सलमान खानला पाठिंबा दर्शवणारं हे ट्विट केल्यानं सोमवारी पप्पू यादव यांना बिश्नोई गँगकडून धमकी आली आहे. या धमकीनंतर यादव यांनी बिहारच्या पोलीस महासंचालकांची भेट घेऊन तक्रार दिली आणि तातडीनं यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून आपली सुरक्षा वाढवायचीही मागणी त्यांनी केली..झिशान सिद्दीकी यांची घेतली भेटराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगनं केलेल्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी मुंबईत सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्धीकी यांची भेट घेतली होती. आपण कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत आहोत. बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा. तसंच हत्येचा कट रचणाऱ्यांचा खात्मा व्हावा कारण कायदा आणि संविधानाच्यावर कोणीही कोणीही नाही, असं ट्विट झिशान यांच्या भेटीनंतर पप्पू यादव यांनी केलं होतं. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.