'तालिबानला माझा सलाम', भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाच्या सदस्याकडून कौतुक

कट्टरपंथीय तालिबानाल शुभेच्छा देताना या 'हिंदी मुस्लिमाचा' तुम्हाला सलाम असे म्हटले आहे.
सज्जाद नोमानी
सज्जाद नोमानी यु्ट्यूब
Updated on

नवी दिल्ली: भारताचे दोन शेजारी चीन (china) आणि पाकिस्तान दोघांनी तालिबान (taliban) राजवटीच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. आता भारतातून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे (All-India Muslim Personal Law Board) सदस्य मौलाना सज्जाद नोमानी (Maulana Sajjad Nomani) यांनी अफगाणिस्तानवर यशस्वी ताबा मिळवल्याबद्दल तालिबानचे कौतुक केले आहे.

मौलान सज्जाद यांनी तालिबानचे कौतुक तर केले आहेच. पण त्याचबरोबर कट्टरपंथीय तालिबानाल शुभेच्छा देताना या 'हिंदी मुस्लिमाचा' तुम्हाला सलाम असे म्हटले आहे. काल समाजवादी पार्टीच्या खासदाराने तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याची भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाशी तुलना केली होती. संभलचे खासदार शफीकुर रहमान यांनी तालिबानची कौतुक केल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका सुरु आहे.

सज्जाद नोमानी
डॅशिंग कार खेळल्यानंतर तालिबान्यांनी अम्युझमेंट पार्कचं पेटवून दिलं?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली. तालिबानला त्यांचा देश मुक्त करायचा होता आणि हा अफगाणिस्तानचा अंतर्गत विषय आहे, असे शफीकुर रहमान म्हणाले. "लाजलज्जेचा कुठलाही विचार न करता ते तालिबानला पाठिंबा देत आहेत. याचा अर्थ ते तालिबानच्या क्रूर कृत्याचेही समर्थन करतात" अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली. "तालिबान ते आहेत, ज्यांनी रशिया आणि अमेरिका या दोघांना अफगाणिस्तानात स्वत:ला स्थापित करु दिले नाही आणि आता त्यांना आपल्या देशात पळून जायचे आहे" असे शफीकुर रहमान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.