Samajwadi Party : पोटनिवडणुकीसाठी ‘सप’, काँग्रेसची आघाडी

उत्तरप्रदेशातील १० विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्ष व काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. यात समाजवादी पक्ष सात तर काँग्रेसकडे तीन मतदारसंघ येण्याची शक्यता आहे.
Samajwadi Party
Samajwadi Party sakal
Updated on

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील १० विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्ष व काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. यात समाजवादी पक्ष सात तर काँग्रेसकडे तीन मतदारसंघ येण्याची शक्यता आहे. नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सप-काँग्रेसच्या आघाडीला चांगले यश मिळाले असून दोन्ही पक्षांचे ४३ खासदार निवडून आलेले आहेत. उत्तरप्रदेशातील काही जण लोकसभेत विजयी झाल्यानंतर उत्तरप्रदेश विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

उत्तरप्रदेशात काही दिवसांतच विधानसभेच्या पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने ‘सप’चे अध्यक्ष अखिलेश लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांनी करहल विधानसभा मतदारसंघांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. याशिवाय मिल्कीपूर, कुंदरली, गाजियाबाद, खैर, मीरापूर, फुलपूर, कटेहारी, मझवा व सीसामऊ या मतदारसंघांचा समावेश आहे.

एकवीस जुलैला बैठक

यापैकी सात मतदारसंघात सपचे उमेदवार तर तीन जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी ‘सप’ने दर्शविली आहे. सध्या उत्तरप्रदेश विधानसभेत काँग्रेसचे केवळ दोनच आमदार निवडून आलेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे या राज्यातून सहा खासदार निवडून आले असून मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे.

यामुळे पोटनिवडणुकीतही ‘सप’सोबत राज्यातील विधानसभेतील संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जात आहे. यासाठी येत्या २१ जुलैला लखनौ येथे संबंधित जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्षांची बैठक आयोजित केली आहे. यात गाझियाबाद, फूलपूर या दोन मतदारसंघांसह एकूण तीन मतदारसंघांवर दावा करण्याची शक्यता आहे.

मौर्य यांना नड्डांनी फटकारले  

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्रमक आणि अनावश्यक विधाने केल्याबद्दल उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी फटकारले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झालेले केशवप्रसाद मौर्य त्यांना देण्यात आलेल्या खात्यामुळे नाखूष आहेत. केंद्रात मंत्री झालेले जितीन प्रसाद यांच्यामुळे रिक्त झालेले सार्वजनिक बांधकाम खाते मिळावे म्हणून त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.