बायकोला तिकीट नाकारून सहकारी पक्षाला सोडली राज्यसभेची जागा

Akhilesh Yadav Dimple Yadav
Akhilesh Yadav Dimple Yadavesakal
Updated on
Summary

उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षानं आपल्या तिन्ही जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

लखनौ : दीर्घ काळ काँग्रेस पक्षात राहिलेले कपिल सिब्बल आता काँग्रेसला राम राम करून समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार आहेत. सिब्बल यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा पाठिंबा घेऊन उमेदवारी अर्ज सादर केलाय. याआधी 16 मे 2022 रोजी सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. दरम्यान, कपिल सिब्बल यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रील लोक दलाचे (RLD) प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलीय. ते समाजवादी पक्ष आणि राष्ट्रील लोक दलाचे संयुक्त उमेदवार असतील.

विशेष म्हणजे, चौधरी यांच्यासाठी अखिलेश यादव यांनी त्यांच्या पत्नी डिंपल यांना उमेदवारी नाकारलीय. दरम्यान, काँग्रेसला दहा दिवसांपूर्वीच सोडचिठ्ठी देणारे कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनीही समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अर्ज दाखल केलाय. समाजवादी पक्षासोबत आघाडी करून राष्ट्रीय लोक दलानं विधानसभा निवडणूक लढवली होती. आता राज्यसभेसाठी समाजवादी पक्षाकडं तीन जागा आहेत. तिसऱ्या जागेवर अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचं नाव चर्चेत होतं. यामुळे जयंत चौधरी हे नाराज झाले होते.

Akhilesh Yadav Dimple Yadav
'ठिणगी कोणी लावली? आगीत कोण जळतंय, शिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादीचा जन्म'

अखेर अखिलेश यादव यांनी पत्नीची उमेदवारी रद्द करून चौधरींना मैदानात उतरवलं आहे. आज सकाळीच खुद्द अखिलेश यांनी फोन करून चौधरींना ते राज्यसभेचे उमेदवार असतील, ही माहिती दिली. दररम्यान, उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षानं आपल्या तिन्ही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. परंतु, या जागांवर सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचं नाव नाहीय. अशा स्थितीत आता सपा प्रमुखांच्या पत्नी राज्यसभेवर जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्याचवेळी डिंपल यादव (Dimple Yadav) आझमगढमधूनच लोकसभा पोटनिवडणूक (Azamgarh Lok Sabha By-election) लढवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()