Lok Sabha Election 2024 Latest News : समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणूक २०२४ साठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पाच उमेदवरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत शिवपास सिंह यादव यांना बदायूं येथून उमेदवारी देण्यात आल्याचे घोषणा देखील करण्यात आली आहे. या या यादीनुसार कैराना येथे इकरा हसन, बरेली येथून प्रवीण सिंह ऐरन, हमीरपूर येथून अजेंद्र सिंह राजपूत आणि वाराणसी येथून सुरेंद्र सिंह पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Samajwadi Party releases a list of candidates for the upcoming Lok Sabha elections)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील आणखी पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच सपा आगामी निवडणूकीसाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज जाहीर केलेल्या यादीत सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यादव यांना बदायूंमधून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी अखिलेश यांचे चुलत बंधू धर्मेंद्र यादव यांनी येथून निवडणूक लढवली होती.
पक्षाने वाराणसीतून सुरेंद्र सिंह पटेल यांना तिकीट दिले आहे, तर या जागेवर विद्यमान खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधानांनी या जागेवरून पुन्हा एकदा निवडणूक लढवल्यास ते येथे सुरेंद्रसिंग पटेल यांच्या विरोधात उभे ठाकतील.
या आधी सोमवारी सपाने 11 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये पक्षाने माफिया मुख्तार अन्सारी अफजल अन्सारी यांना गाझीपूरमधून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यावरून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे. याशिवाय, मुझफ्फरनगर जागेवर उमेदवार घोषित करून, आता सपाने जयंत चौधरी यांच्या आरएलडीशी फारकत घेतल्याचे स्पष्ट केले आहे. कारण या दोन्ही पक्षांची युती असताना सपाने ही जागा आरएलडीसाठी सोडली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.