Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

आपल्या चुकून केलेल्या विधानाबद्दल पात्रा यांनी पुन्हा एकदा माफीही मागितली आहे.
Sambit Patra will fast for 3 days over slip of tongue on Lord Jagannath  PM Modi
Sambit Patra will fast for 3 days over slip of tongue on Lord Jagannath PM Modi
Updated on

भुवनेश्‍वर, ता. २१ (पीटीआय) : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरल्याने चुकीचे शब्द बाहेर पडल्याचा पश्चात्ताप म्हणून आजपासून तीन दिवस उपवास करणार असल्याचे भाजपचे नेते संबित पात्रा यांनी जाहीर केले आहे. आपल्या चुकून केलेल्या विधानाबद्दल पात्रा यांनी पुन्हा एकदा माफीही मागितली आहे.

दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना ‘भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत’ असे विधान संबित पात्रा यांनी केले होते. मात्र, ‘जीभ घसरल्याने’ तोंडातून विधान चुकीचे निघाल्याचे आणि ‘मोदी हे भगवान जगन्नाथाचे भक्त आहेत’ असे म्हणायचे होते, असे पात्रा यांनी लगेचच स्पष्टीकरण दिले होते आणि माफीही मागितली होती. मात्र, त्यांच्या विधानावरून ओडिशामध्ये प्रचंड वाद झाला.

Sambit Patra will fast for 3 days over slip of tongue on Lord Jagannath  PM Modi
Pune Accident: पुण्यातील 'त्या' अपघात प्रकरणी पोलीसांवर दबाव, सुनील टिंगरे यांनी दिलं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पात्रा यांचा निषेध करतानाच, भाजप हा स्वत:ला भगवान जगन्नाथाच्याही वर समजतात, असा आरोप केला होता. तसेच, ओडिशाच्या अस्मितेला धक्का बसल्याचाही दावा पटनाईक यांनी केला होता. या वादानंतर संबित पात्रा यांनी आज ‘एक्स’वर पोस्ट करत उपवासाचा निर्णय जाहीर केला आहे. ‘माझ्या चुकीबद्दल मी भगवान जगन्नाथाच्या चरणाशी माफी मागतो आणि पश्‍चात्ताप म्हणून आजपासून तीन दिवस उपवास करतो,’ असे पात्रा यांनी म्हटले आहे.

Sambit Patra will fast for 3 days over slip of tongue on Lord Jagannath  PM Modi
Pune Porsche Accident: आम्ही आमची मुलं मोठी होत नाहीत पर्यंत...', पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर वडिलांचा राग अनावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.