नवी दिल्ली : LGBTQ ही शहरी किंवा उच्चभ्रूंपर्यंत मर्यादीत गोष्ट नाही, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली आहे. 'सेम सेक्स मॅरेज' अर्थात समलैंगिक विवाह या विषयावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यावेळी सुप्रीम कोर्टानं एक महत्वाची टिप्पणी केली आहे. (Same Sex marriage LGBTQ is not something limited to urban or elite Imp Comment of Supreme Court)
सरन्यायाधीश CJI चंद्रचूड म्हणतात की, "समलैंगिकता ही शहरी संकल्पना नाही किंवा समाजाच्या उच्च वर्गांपुरती मर्यादित नाही. समलैंगिकता ही एखाद्याची जात-वर्ग किंवा सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता कोणमध्येही असू शकते" (Latest Marathi News)
नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची सुरक्षा करणं ही कोर्टाची जबाबदारी आहे. वेळेनुसार लग्न परंपरेत मोठे बदल होत आहेत. पण लग्नाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे.
समलैंगिकता हा नवा विषय नाही, लोक समलैंगिक असू शकतात, भलेही ते गावातील असतील किंवा शहरातील असतो. त्याचबरोबर इंग्रजी बोलणारा पुरुषच समलैंगिक असतो असं होऊ शकतं नाही तर ग्रामीण भागात शेतात काम करणारी महिलाही आपण समलैंगिक असू शकते.
समलैंगिक जोडपे किंवा त्यांच्या नात्यासंबंधी एफआयआर दाखल करण्यापूर्वी याची प्राथमिक चौकशी करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं पोलिसांना दिले आहेत. विवाह समानता खटल्यात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी हे निर्देश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.