Kisan Mahapanchayat: संयुक्त किसान मोर्चाला रामलीला मैदानावर महापंचायत घेण्यास परवानगी; राजधानीतील वाहतुकीवर होणार परिणाम?

Kisan Mahapanchayat: शेतकऱ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर गौतम बुद्ध नगर पोलिसांनी प्रवाशांना नोएडा-दिल्ली मार्गावरील वाहतूक कमी करण्याबाबत इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे.
Kisan Mahapanchayat
Kisan MahapanchayatEsakal
Updated on

Kisan Mahapanchayat: संयुक्त किसान मोर्चाकडून आज (गुरूवारी १४ मार्चला) दिल्लीच्या रामलीला मैदानावर किसान महापंचायत बोलावली आहे. या महापंचायतीसाठी देशभरातील शेतकरी, जास्त प्रमाणात उत्तर भारतीतील शेतकरी यावेळी उपस्थित असणार आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मेळाव्याला काही अटीसह परवानगी दिली आहे. महापंचायतमध्ये 5,000 पेक्षा जास्त लोक सहभागी होणार नाहीत किंवा ठिकाणाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलींना परवानगी दिली जाणार नाही.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रामलीला मैदानावर शेतकऱ्यांच्या मेळाव्यामुळे राजधानीच्या विविध भागांत वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. गौतम बुद्ध नगर पोलिसांनी बुधवारी प्रवाशांना दिल्लीतील प्रस्तावित शेतकऱ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर नोएडा-दिल्ली मार्गावरील वाहतूक संथगतीने होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Kisan Mahapanchayat
Supreme Court: अल्पवयीन विद्यार्थीनीला फूल देणे लैंगिक अत्याचारच; तरी सुप्रीम कोर्टाने शिक्षकाची का केली सुटका?

येथील वाहतुकीवर होऊ शकतो परिणाम

दिल्लीतील शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या ॲडव्हायझरीनुसार, जवाहरलाल नेहरू मार्ग, बाराखंबा रोड, बहादूरशाह जफर मार्ग, टॉलस्टॉय मार्ग, असफ अली रोड, जयसिंग रोड, स्वामी विवेकानंद मार्ग, संसद मार्ग, नेताजी सुभाष मार्ग, बाबा खरगसिंग मार्ग, मिंटो रोड, अशोक रोड, महाराजा रणजित सिंग फ्लायओव्हर, कॅनॉट सर्कस, भवभूती मार्ग, डीडीयू मार्ग आणि चमन लाल मार्ग येथील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Kisan Mahapanchayat
Accident Video: भर बाजारात घुसली भरधाव कार.. १० ते १२ जणांना उडवलं! महिलेचा जागीच मृत्यू, थरारक व्हिडिओ समोर

या ठिकाणची वाहतूक वळविली जाऊ शकते

गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून दिल्ली गेट, मीर दर्द चौक, अजमेरी गेट चौक, गुरु नानक चौक, कमला मार्केट, पहाडगंज चौक, झंडेवालान चौक, महाराजा रणजितसिंग फ्लायओव्हर ते बाराखंबा रोड, गुरु नानक चौक, बाराखंबा रोड या मार्गावर जावे लागेल. जनपथ केजी मार्ग क्रॉसिंग आणि जीपीओ (ग्राउंड पोस्ट ऑफिस) राउंडअबाउटपर्यंत वाहतूक वळविली जाऊ शकते. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी ISBT, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

Kisan Mahapanchayat
BJP Candidate 2nd List Loksabha 2024: भाजपच्या ७२ उमेदवारांची घोषणा! कोणत्या राज्यात कुणाला मिळालं तिकीट? संपूर्ण माहिती...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.