Udaynidhi Stalin News : सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिवक्ता अॅड. राम सिंग लोधी अधिवक्ता हर्ष गुप्ता यांनी एसपींकडे एका पत्राच्या माध्यामातून तक्रार केली होती.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा आणि कर्नाटक सरकारमधील ग्रामीण आणि पंचायती राज मंत्री प्रियांका खरगे यांनी सनातन धर्मावर भाष्य केले होते. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्म संपवण्याचे आवाहन केल्याने आणि खरगे यांच्यावर वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपी अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, आयपीसीच्या कलम 153A, 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टॅलिन यांनी शनिवारी तामिळनाडूमध्ये एका कार्यक्रमात सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. या प्रकरणी राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि भाजपने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसवर हल्ला चढवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.