Sanatan Dharma Controversy: सनातन धर्माची HIV बरोबर तुलना, उदयनिधीनंतर आणखी एका नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत

सनातन धर्मावरवर होणाऱ्या वादग्रस्त विधानांचे सत्र सुरूच आहेत
Sanatan Dharma Controversy
Sanatan Dharma ControversyEsakal
Updated on

सनातन धर्मावरवर होणाऱ्या वादग्रस्त विधानांचे सत्र सुरूच आहेत. उदयनिधीनंतर आता त्यात अजून एका नेत्याची भर पडली आहे. डीएमके खासदार ए. राजा यांनी, सनातन धर्माची तुलना HIV बरोबर केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ए.राजा यांनी सनातन धर्मावरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिबेटच आव्हानही दिलं आहे.

“उदयनिधी या संपूर्ण वादावर जे काही बोलले, ते फार कमी आहे. त्यांनी फक्त मलेरिया आणि डेंग्यु म्हटलं आहे. डीएमकेचे ए राजा यांनी सनातन धर्माचा अपमान करून त्याची तुलना एचआयव्हीशी केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार ए राजा म्हणाले की, 'सनातन धर्म हा एक सामाजिक आजार आहे. हे कुष्ठरोग आणि एचआयव्ही पेक्षा जास्त प्राणघातक आहे.

Sanatan Dharma Controversy
Sanatan Dharma Row : सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार! उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खरगे अडचणीत

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि डीएमके सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरुन केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. आपण डेंग्यु, मलेरिया आणि कोरोनाला विरोध करु शकत नाही. आपल्याला या मच्छरांना संपवावच लागेल, तसच आपल्याला सनातनला संपवाव लागेल. सनातनला विरोध करण्याऐवजी संपवलच पाहिजे” असं उदयनिधी स्टालिन एका कार्यक्रमात म्हणाले होते. तेव्हापासून हा वाद निर्माण झाला आहे.

Sanatan Dharma Controversy
Sanatana Dharma Controversy : 'हे तुमचं मत असू शकतं पण...'; उदयनिधींच्या ‘सनातन धर्मा’वरील वक्तव्यावर ठाकरे गटाची भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.