नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली ईडीकडून अटक झाली असून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, मंगळवारी त्यांना रोज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना १६ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर पांडे यांच्यावतीनं जामिनासाठी देखील अर्ज दाखल करण्यात आला. यावर उद्या सुनावणी होणार आहे. (Sanjay Pandey remanded in judicial custody till August 16 Bail hearing tomorrow)
विशेष न्यायमूर्ती सुनेना शर्मा यांनी म्हटलं की, २९ जुलै रोजी संजय पांडे यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांची कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. आता तपास अधिकाऱ्यांनी अर्ज केला की, पांडे यांची अधिक चौकशी करायची आहे. त्यामुळं त्यांना सीआरपीसी आणि पीएमएलए कायद्यानुसार, न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. त्यानुसार, आरोपी संजय पांडे यांना १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येत आहे.
तथापि, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आज प्रत्यक्ष हजर राहू शकले नसल्यामुळं संजय पांडे यांचा जामीन अर्जावर आज अर्धवट युक्तिवाद झाला. त्यामुळं जामीन मंजूर करण्याच्या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या, ३ ऑगस्ट रोजी युक्तिवाद होईल असं न्यायालयाने सांगितलं. दरम्यान, अधिवक्ता नवीन कुमार मटा यांनी ईडीकडून जामीनाला विरोध केला.
संजय पांडे यांनी आपल्या अर्जात म्हटलं की, "आपण अनेक हायप्रोफाइल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांचा तपास केला आणि खटले चालवले तसेच त्वरित कार्यवाही देखील केल्या. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे केलेल्या कर्तव्याचा हा राजकीय सूड आहे. सन 2009 ते 2017 दरम्यान कथितरित्या घडलेल्या गुन्ह्याचा तपास 2022 मध्ये केला जात आहे. म्हणजेच या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तेरा वर्षांनंतर आणि ते बंद झाल्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा सुरु झाले. तेही मी माझं कार्यालय सोडल्यानंतर एका आठवड्याच्या आत या चौकशीला सुरुवात झाली यावरुन हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, असं संजय पांडे यांनी आपली बाजू मांडताना जामीन अर्जात म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.