युट्यूब अकाऊंट बंद; संसद टीव्हीचा गंभीर आरोप, म्हणाले..

केंद्र सरकारच्या संसद टीव्हीचे युट्यूब अकाऊंट गूगलने बंद केले
YouTube
YouTubeटिम ई सकाळ
Updated on

केंद्र सरकारच्या संसद टीव्हीचे युट्यूब (YouTube) अकाऊंट गूगलने बंद केले आहे. सामुदायिक नियमांचा भंग केल्याने ही कारवाई केल्याचा संदेश युट्यूब वर येतोय.

YouTube
देशात २४ तासात कोरोनाचे २७ हजार ४०९ नवे रुग्ण; 347 मृत्यू

नियमांचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा संदेश युट्युब वर येतोय. हे अकाऊंट बंद केल्याने आता अकाऊंट वरील जुने - नवीन कुठलेही व्हिडीओ पाहता येत नाही. या कारवाईमुळे खळबळ उडाली असुन नेमक्या कुठल्या नियमांचा भंग करण्यात आलाय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.

YouTube
Hijab Controversy : २८ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी थांबवा; कारण...

तर यावर संसद टिव्ही ने स्पष्टीकरण दिले आहे. संसद टिव्हीने म्हटले आहे, " युट्युब चॅनल-संसद टीव्हीशी 15 फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता काही घोटाळेबाजांनी छेडछाड केली होती. त्यात या चॅनेलवरील लाईव्ह स्ट्रीमिंगचा समावेश होता. घोटाळेबाजांनी चॅनेलचे नाव बदलून 'इथेरियम' केले होते. संसद टीव्हीच्या सोशल मीडिया टीमने तातडीने यावर काम केले आणि पहाटे 3:45 च्या सुमारास संसद टीव्ही चॅनल पूर्ववत केले."

सोबत संसद टिव्हीने यावर कायमचे निराकरण करण्यास सुरुवात केली असुन संसद टीव्हीचे युट्युब चॅनल लवकरच पुनर्संचयित केली जाईल, अशी सुध्दा माहिती संसद टीव्हीने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.