नवी दिल्ली- सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारताच्या एकत्रीकरणात मोठे योगदान आहे. आज त्यांची 70 वी पुण्यतिथी. सरदार पटेल नसते तर आपल्याला आज जो भारत दिसतोय तसा दिसला नसता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या प्रांतांना कठोरपणे भारतामध्ये सामील करुन घेतले. त्यामुळेच त्यांना देश लोहपुरुष म्हणून ओळखतो. सरदार वल्लभभाई यांचे योगदान केवळ भारताच्या एकत्रीकरणात होते असं नाही, तर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले आहे. ते देशाचे पहिले उपप्रधानमंत्री होते. 2014 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
15 डिसेंबर रोजी घेतला अखेरचा श्वास
15 डिसेंबर 1950 ला त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. बिर्ला हाऊसमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1947 मध्ये जेव्हा पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, त्यावेळ सरदार पटेल गृहमंत्री होते. त्यांनी या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले. पटेल दुरदर्शी नेते होते. त्यांनी चीनच्या तिबेटवरील हल्ल्याला चुकीचे ठरवलं, भविष्यात यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील, असं ते म्हणाले होते. जगातील सर्वोत मोठी प्रतिमा स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार पटेलांचीच आहे. 1991 साली सरदार पटेलांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात आला.
वकील होते सरदार
गुजरातच्या नाडियाड जिल्ह्यात जन्मलेले सरदार पटेल यांची ओळख देशाच्या यशस्वी वकीलांमध्ये केली जाते. त्यांनी लंडनमध्ये मेडिकल कॉलेजमधून लॉचे शिक्षण घेतले होते. जेव्हा त्यांचे दोन मुलं 5 आणि 3 वर्षांचे होते, त्यावेळी त्यांच्या पत्नीचा कँसरमुळे मृत्यू झाला होता. 1917 मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट महात्मा गांधींशी झाली. सरदार यांनी इंग्रजांकडे स्वराज्याची मागणी केली होती.
सरदार एक नेताच नव्हते, तर समाजसेवकही होते. ज्यावेळी गुजरातच्या खेडामध्ये प्लेगची महामारी पसरली होती, त्यावेळी त्यांनी लोकांसाठी मदतकार्य सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी आपला वकीलीचा व्यवसाय पू्र्णपणे सोडून दिला आणि देशसेवेला वाहून घेतलं. त्यांनीच गुजरातमध्ये सत्याग्रहाची सुरुवात केली.
खेडामधील आंदोलन
भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात त्यांचे सर्वात पहिले योगदान 1918 च्या खेडा सत्याग्रहात पाहायला मिळते. खेडातील अवर्षणामुळे शेतकऱ्यांनी सरकारला करामध्ये सूट देण्याची मागणी केली, पण ती फेटाळण्यात आली. त्यानंतर पटेलांनी शेतकऱ्यांना एकत्र करत आंदोलन उभे केले. शेवटी सरकारला झुकावे लागले आणि शेतकऱ्यांचे कर कमी करावे लागले.
स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
सरदार पटेल 1920 मध्ये गुजरात राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी संपूर्ण राज्यात दारुमुक्ती, शिवाशिव, जातीवाद आणि महिला सशक्तीकरणासाठी काम केलं. महात्मा गांधींनी चावलेल्या असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि देशवासीयांना खादी कपडे घालण्यासाठी प्रोत्साहित केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या 562 संस्थानांना भारतात सामील होण्यास राजी केले. हैदराबाद आणि जूनागडला भारतात सामील करण्यासाठी त्यांना सैन्याचे सहाय्य घ्यावे लागले.
सौराष्ट्राच्या जवळ असणारा जूनागड भारताच्या भूमीने घेरलेला एक छोटासा भाग आहे. पण, भारताच्या स्वातंत्र्यानंतर येथील नवाबाने जुनागडचे पाकिस्तानमध्ये विलगीकरणाची घोषणा केली. सर्वसामान्य जनता याच्या विरोधात होती. जुनागडमध्ये बहुसंख्येने हिंदू राहात, त्यांना पाकिस्तानमध्ये जायचं नव्हतं. त्यामुळे सरदार पटेलांनी भारतीय लष्कराला मैदानात उतरवले. याला घाबरुन नवाब पाकिस्तानला पळून गेला आणि 9 नोव्हेंबर 1947 ला जुनागड भारतात सामील झाला. फेब्रुवारी 1948 मध्ये येथे जनमत घेण्यात आले, त्यावेळी बहुसंख्य लोकांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता.
हैदराबाद
हैदराबाद पूर्णपणे भारतीय भूमिने वेढलेला प्रदेश आहे. येथील निजामाने भारतात सामील न होण्याची घोषणा केली. निजाम भारताशी संघर्ष करण्यासाठी आपली सैन्य क्षमता वाढवत होता. त्यामुळे पटेल चिंतीत होते. पटेलांनी निजामाला स्पष्ट शब्दात सांगितलं की ''भारतात शांतीपूर्ण पद्धतीने सामील व्हा, अन्यथा हैदराबादमध्ये लष्कर उतरवावे लागेल. त्यानंतर जे होईल त्याची जबाबदारी निजामाची असेल.'' निजाम यामुळे घाबरला आणि 13 डिसेंबर 1948 मध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन पोलो अंतर्गत हैदराबादमध्ये प्रवेश केला. तीन दिवसांनी निजामाने आत्मसमर्पन केले. नोव्हेंबर 1948 मध्ये हैदराबाद भारतात सामिल झाला.
(edited by- kartik pujari)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.