Statue of Unity : काँग्रेसकडून पटेल यांचा सतत अपमान

अमित शहा : भीतीपोटी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट देण्याची काँग्रेस नेत्यांची हिंमत झाली नाही
Statue of Unity
Statue of Unity
Updated on

खंबात : ‘‘सरदार वल्लभभाई पटेल यांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसने शक्य ते सर्व केले आणि आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पटेल यांची स्तुती करण्यास सुरुवात आहे,’’ अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली. देशाच्या पहिल्या उपपंतप्रधानांचे अंत्यसंस्कारदेखील अनौपचारिक पद्धतीने पार पडले, असे ते म्हणाले.

आनंद जिल्ह्यातील खंबात येथे भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ शहा यांची प्रचारसभा आज झाला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा संदर्भ घेत त्यांनी काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला. ते म्हणाले, ‘‘काँग्रेस आता सरदार पटेल यांचे गुणगान करीत आहे, याचे मला आश्चर्य वाटते. काँग्रेसचा एखादा नेता पटेल यांच्याविषयी बोलत आहे, असे माझ्या लहानपणापासून मी कधीही ऐकलेले नाही.

उलट त्यांचा अपमान करण्याची संधी या पक्षाने कधीही सोडली नाही. त्यांचे अंत्यसंस्कार अनौपचारिक पद्धतीने करण्यापासून त्यांच्या स्मरणार्थ एकही स्मारक उभारण्याची तसदी काँग्रेसने घेतली नाही. यातून पटेल यांचा अपमान करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही.’’

काँग्रेसला मतांची भीती

पटेल यांचा जगातील सर्वांत उंच असा एकतेचा पुतळा (स्टॅच्यु ऑफ युनिटी) उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांना खरीखुरी आदरांजली वाहिली आहे, असे सांगत शहा यांनी खंबातमधील काँग्रेसचे उमेदवार चिराग पटेल यांनी एकतेच्या पुतळ्याजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिल्याचे एक तरी छायाचित्र दाखवावे, असे आव्हान दिले.

निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, या भीतीने सरदार पटेल यांच्या पुतळ्याला भेट देण्याची काँग्रेसच्या एकाही नेत्याची हिंमत झाली नाही, असे शहा म्हणाले. काँग्रेसने मतपेढीच्या राजकारणातून अयोध्येतील राम मंदिर आणि तोंडी तलाक प्रतिबंध कायद्याला काँग्रेस विरोध करीत आहे. जर या मुद्द्यांना पाठिंबा दिला तर त्यांना मतांवर पाणी सोडावे लागेल, अशी भीती या पक्षाला वाटत आहे.

‘‘राममंदिराचे उद्‍घाटन १ जानेवारी २०२४ मध्ये होणार असल्याने राहुल बाबा (गांधी) अयोध्येचे तिकीट आरक्षित करून ठेवा’’

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.