Sardar Vallabhbhai Patel |सरदार पटेल आणि काश्मिर

Sardar Vallabhbhai Patel | काश्मिरबाबत सरदार पटेलांची भुमिका ही व्यवहार्य आणि ठाम होती.
Sardar Vallabhbhai Patel
Sardar Vallabhbhai Patel ESAKAL
Updated on

भारताचे पहिले गृहमंत्री (India's First Home minister) सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची आज पुण्यतिथी (Death anniversary) आहे. भारताचे बिस्मार्क आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल हे ५६५ संस्थानांच्या (institutions) विलीनीकरणासाठी ओळखले जातात. संस्थानांच्या विलीनीकरणाचा विषय सरदार वल्लभभाई पटेलांनी अगदी कौशल्याने हाताळला. भारत (India) एकसंध होण्यात त्यांचं योगदान सर्वमान्य आहे. काश्मिर प्रश्नावर सरदार पटेल यांचे मत काय होते त्यांची भुमिका काय होती हे आज जाणून घेऊया.

Sardar Vallabhbhai Patel
देशाची अखंडता अन् एकता जपणारे 'सरदार'

सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय सचिव असलेले व्ही. शंकर (V. Shankar) त्यांच्या 'माय मेमोयर्स विथ सरदार पटेल' या पुस्तकात लिहितात, 'जम्मू आणि काश्मिर भारताचा भाग होईल अशी महात्मा गांधींना अपेक्षा होती आणि त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता.' ते लिहितात की सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा निर्णय पूर्णपणे जम्मू आणि काश्मीरचे शासक महाराजा हरिसिंह यांच्यावर सोपवला होता.'महाराजांना आपले आणि आपल्या राज्याचे हित पाकिस्तानबरोबर जाण्यात आहे, असे समजले तर ते आपल्या मार्गात येणार नाहीत,' असे सरदार पटेलांचे व्यवहार्य मत होते. परंतु नंतरच्या काळात पाकिस्तानने काश्मिरवर आक्रमण केले आणि सरदार पटेलांना काश्मिर भारतात विलीन करण्याची संधी चालून आली. भारताने काश्मिरचा राजा हरिसिंगाशी करार करून काश्मिर भारतात विलीन करून घेतले.

Sardar Vallabhbhai Patel
राष्ट्रीय एकता दिवस: अमित शहांनी वाहिली सरदार पटेलांना आदरांजली

स्वातंत्र्यपुर्व काळात माउंटबॅटन यांचे राजकीय सल्लागार तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचे सचिव म्हणून काम पाहिलेले व्हीपी मेनन यांनी भारतातील संस्थानांच्या विलीनीकरणाविषयी एक पुस्तक लिहिलं आहे. मेनन यांनी त्यांच्या 'इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स' नावाच्या पुस्तकात तत्कालीन घडामोडींचा तपशील दिला आहे. ते लिहितात की 18 ते 23 जून 1947 ला लॉर्ड माउंटबॅटन काश्मीरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाराजा हरिसिंह यांना सांगितले की, 'जर काश्मीर पाकिस्तानसोबत गेले तर भारत सरकारसोबतचे संबंध कमकुवत होणार नाहीत.' एवढेच नाही तर सरदार पटेल यांच्याकडून या संदर्भात पूर्ण आश्वासनही देण्यात आल्याचे माउंटबॅटन म्हणाले होते.

Sardar Vallabhbhai Patel
सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल दुरुस्ती अंतिम टप्प्यात; प्रसुतिगृह होणार सूरू

तसेच शेषराव मोरे यांनी आपल्या 'काश्मिर एक शापित नंदनवन' या पुस्तकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या काश्मीरविषयक दृष्टीकोनाबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या मते सरदार वल्लभभाई पटेल यांचे काश्मीरविषय धोरण हे अतिशय व्यवहार्य होतं. काश्मीर हा मुस्लिमबहुल होता तसेच तो त्याची सीमाही पाकिस्तानला लागून आहे. त्यामुळे पाकिस्तान फाळणीच्या अटींनुसार काश्मिर पाकिस्तानात विलीन होऊ शकत होता. परंतु पाकिस्ताननं हल्ला केला केला आणि सरदार वल्लभभाई पटेल, पंतप्रधान नेहरू यांनी वेळ न घालवता तातडीने करार करून काश्मिरसुद्धा भारतात विलीन करून घेतला आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग झाला. एकंदरीतच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत आज एकसंध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.