'सतर्क आणि सावधान! मोदींच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

'सतर्क आणि सावधान! मोदींच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज गुरुवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली आहे. देशावर सध्या ओमिक्रॉन व्हेरियंटचं (Omicron variant) सावट असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची (coronavirus disease) शक्यता वर्तवली जात आहे.

'सतर्क आणि सावधान! मोदींच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना
रुग्णसंख्या वाढतेय! रात्री दहाला मुख्यमंत्री घेणार आढावा बैठक
'सतर्क आणि सावधान! मोदींच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना
राज्याच्या चिंतेत भर; दिवसभरात ओमिक्रॉनचे २३ नवे रुग्ण!

या बैठकीबाबत माहिती देताना सरकारी पत्रकात म्हटलंय की, पंतप्रधानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काटेकोर सतर्कता आणि दक्षता ठेवण्यास सांगितलंय. तसेच त्यांनी केंद्राला राज्यांशी जवळून समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपायांना पाठिंबा देऊन सहकार्य करण्याबाबत देखील त्यांनी सूचना दिल्या आहेत. कोरोना रोगाविरूद्ध सक्रिय, लक्ष केंद्रित, सहयोगी आणि सहकारी लढ्यासाठी केंद्राची रणनीती आपल्या भविष्यातील सर्व कृतींना मार्गदर्शन करेल, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.

ओमिक्रॉनच्या या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर, आपण ‘सतर्क’ (सावधान) आणि ‘दक्ष’ असलं पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले आहेत. कोरोना रोगाविरुद्धचा आपला हा लढा संपलेला नाहीये, कोरोना नियमावली पाळत योग्य वर्तनाचे सतत पालन करण्याच्या गरज असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना अशाही सूचना केल्या आहेत की, ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी जिल्हा स्तरापासून सुरुवात करून राज्यांमधील आरोग्य यंत्रणा बळकट केली जावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.