आनंदाची बातमी! कर्नाटकातील 'हे' प्रसिद्ध मंदिर आजपासून खुले, देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर येतात लाखो भाविक

लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर येतात.
Saundatti Yellamma Temple
Saundatti Yellamma Temple esakal
Updated on
Summary

राज्य सरकारने महिलांना मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी शक्ती योजनेची अंमलबजावणी केल्याने दर्शनासाठी गर्दी होणार आहे.

बेळगाव : सौंदती डोंगरावर (Saundatti Hill) रेणुका देवीच्या (यल्लमा) दर्शनासाठीची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. आजपासून (ता. १७) यल्लम्मा मंदिरात (Yellamma Temple) विविध धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. श्रावण मासानिमित्त यंदा पहाटे चारपासूनच मंदिर खुले होणार आहे.

दरवर्षी श्रावण महिन्याच्या निमित्ताने दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील भाविक देवीच्या (Renuka Devi) दर्शनाला येतात. विविध जिल्ह्यांतून आणि शेजारील राज्यांतून येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली आहे. याशिवाय, राज्य सरकारने महिलांना मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी शक्ती योजनेची अंमलबजावणी केल्याने दर्शनासाठी गर्दी होणार आहे.

Saundatti Yellamma Temple
NCP Crisis : राजकीय घडामोडी सुरु असताना अजितदादा शरद पवारांना का भेटले? अखेर कारण आलं समोर; खुद्द दादानीच केला खुलासा

पौर्णिमेच्या दिवशी भाविकांकडून धान्य आणि पैसे गोळा करून सामूहिक पडली भरण्याची योजना यंदा मंदिर प्रशासनाने आखली आहे. देवी दर्शनाला सामान्य दिवशी सकाळी सहापासून परवानगी होती. मात्र, श्रावण महिन्यामुळे वेळेत बदल करण्यात आला असून रात्री दोन वाजता देवीची विशेष पूजा व विविध फुलांनी विशेष सजावट करण्यात येणार आहे.

Saundatti Yellamma Temple
Kolhapur Ganeshotsav : एक दिवस तुमचा, पुढील 364 दिवस आमचे असतील; साऊंड सिस्टीमबाबत पोलिस अधीक्षकांचा थेट इशारा

सामूहिक पडली

देवीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक दरवर्षी देवीची सामूहिक पडली देखील भरतात. त्यामुळे यंदा प्रथमच मंदिर प्रशासनाकडून अन्नछत्रातच त्याची व्यवस्था केली आहे. पडलीसाठी धान्य आणि पैसे दिल्यानंतर अन्नछत्रात नैवेद्य तयार केला जाणार असून तो सामूहिक पडली भरण्यासाठी गावकऱ्यांना वितरित केला जाईल.

सामूहिक पडली भरल्यानंतर अन्नछत्रातच महाप्रसादाची व्यवस्था असेल. लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर येतात. प्रत्येक गावातून स्वतंत्र चुली मांडत, त्या ठिकाणी स्वयंपाक केला जातो. नंतर देवीला सामूहिक पडली भरली जाते. त्यामुळे डोंगरावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. हे टाळण्यासाठी यंदा हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

Saundatti Yellamma Temple
LokSabha Election : लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार ठरले! कोल्हापुरातून 'हे' नेते लढवणार निवडणूक? महाडिकांनी दिले स्पष्ट संकेत

यल्लम्मा मंदिराला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस विभागाकडून अधिक बंदोबस्त पुरविण्यात येत आहे. श्रावण महिन्यानिमित्त यल्लम्मा मंदिरात येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून तेथे दररोज महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

- बसय्या हिरेमठ, अध्यक्ष, रेणुका मंदिर व्यवस्थापन समिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()